क्राइम

अवैधरीत्या शस्त्र बाळगणाऱ्या आरोपीला अटक -: स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामीण ची कारवाई :-

Spread the love

नागपूर / प्रतिनिधी

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस स्टेशन खापरखेडा हद्दीत पेट्रोलिंग करीत असता गुप्त बातमीदारांकडुन माहिती मिळाली की, पोलीस स्टेशन खापरखेडा हद्दीत सिल्लेवाडा येथे राहणारा सुरेश प्रजापती हा आपले जवळ अवैधरीत्या अग्नीशस्त्र (माऊजर ) बाळगून रात्री दरम्यान काहीतरी गंभीर गुन्हा करण्याचे उद्देशाने मोटार सायकलने फिरत आहे यावरून आरोपी नामे- सुरेश बिजाधर प्रजापति, वय ३५ वर्ष, सिल्लेवाडा यास नाकाबंदी करून त्याला थांबवुन त्याची पंचाचे समक्ष अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यातुन १) एक माऊजर दोन कारतुस सह मिळुन आला. सदर हत्यारा बाबत आरोपीला परवाना विचारला असता त्याच्या जवळ कोणत्याही प्रकारचे कागदपत्रे मिळुन आले नाही. आरोपीच्या ताब्यातुन १) एक माऊजर दोन कारतुस सह किंमती अंदाजे ४०,०००/- रू. २) दोन कारतुस किंमती अंदाजे २०००/- रु. ३) एक मोटारसायकल किंमती अंदाजे १५,०००/- रु. असा एकूण ५७००० /- रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपीविरूद्ध पोलीस स्टेशन खापरखेडा येथे कलम ३, २५ ऑर्म अॅक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही नागपुर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदिप पखाले यांचे मार्गदर्शनात परी पोलीस अधिक्षक अनिल म्हस्के, परी पोलीस उपअधीक्षक राहुल झालटे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. ओमप्रकाश कोकाटे, सहायक पोलीस निरीक्षक अनिल राऊत, पोलीस हवालदार विनोद काळे, नाना राऊत, इकबाल शेख, पोलीस नायक विरू नरड, मोनु शुक्ला यांचे पथकाने केली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close