सामाजिक
वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू
वर्धा : सेलू तालुक्यातील कोटंबा येथे वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर नागठाणा येथे वीज पडून बैलजोडी चा मृत्यू झाला आहे.
कोटंबा येथील शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला. मोरेश्वर देविदास वांदिले असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. शेतकरी शिवारातील शेतात गेला असताना अंगावर वीज पडली, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. शेतकऱ्याच्या मृत्यूने सर्वत्र शोककळा पसरली आहे. तरनागठाणा शिवारात वीज पडून बैलजोडी दगावल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1