अपघात

रेल्वेने कटून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू 

Spread the love
धामणगाव रेल्वे (अमरावती,) /प्रतिनिधी 
    धामणगाव रेल्वे (अमरावती) येथे अहमदाबाद – हावडा एक्सप्रेस ने कटून एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार  अहमदाबाद कडून हावडा कडे जाणाऱ्या एक्सप्रेस गाडीत बसलेला व्यक्ती धामणगाव स्टेशनं वरगाडी थांबल्याने  उतरला होता. गाडी सुरु होताच त्याने आपल्या डब्याकडे धाव घेतली. पण त्याच्या हातात पाण्याची बॉटल आणि चिप्स चे पॅकेट असल्याने गाडीत चढतांना त्याचा हात घसरला आणि गाडी खाली आल्याने त्याचा मृत्यू  झाला.
               आरपीएफ ने मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय येथील पाठवला असून मृतका बाबत माहिती गोळा करणे सुरु आहे.
 आता  हाती आलेल्या माहिती नुसार त्या इसमाचा मृत्यू झाला नसून तो गंभीर जखमी आहे. चुकीची  माहिती मिळाल्याने जखमी ऐवजी मृत्यू असे लिहण्यात आले. त्यासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. 
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close