क्राइम

तरुणाने महिलेवर झाडली गोळी ; महिलेचा मृत्यू 

Spread the love

नवी दिल्ली / नवप्रहार मीडिया नेटवर्क 

देशाची राजधानी दिल्लीतुन एक थरारक घटना समोर येत आहे.येथे एका 23 वर्षीय युवकानें एका महिलेच्या डोक्यात  गोळ्या झाडून हत्या केली आहे. आणि त्यानंतर स्वतः वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली आहे. हत्येमागील कारण अध्याप कळू शकले नसले तरी त्यांची जिम च्या माध्यमातून जुनी ओळख होती असे समजत आहे.

मृत महिलेच नाव रेणु गोयल असून आरोपीच नाव आशिष आहे. दिल्लीच्या डाबरी भागात गुरुवारी रात्री हे हत्याकांड घडलं. गुन्हा केल्यानंतर आरोपीने स्वत:ला सुद्धा संपवलं. गुन्ह्यासाठी देशी बनावटीच्या पिस्तुलचा वापर झाला.

“रेणुच्या घराजवळच आशिष राहत होता. तपासकर्त्यांची टीम त्याच्या घरी गेली होती. आरोपी आशिषने देशी बनावटीच्या पिस्तुलने घरच्या गच्चीवर स्वत:च आयुष्य संपवलं” असं पोलिसांनी सांगितलं. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

अशी झाली होती  ओळख?

आशिष आणि रेणू एकाच जीममध्ये जायचे. काही वर्षांपूर्वी तिथे त्यांची ओळख झालेली. आशिषने गोळी झाडल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या रेणू गोयलला लगेच रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. पण डॉक्टरांनी तपासल्यानंतर तिला मृत घोषित केलं.

पोलिसांनी काय सांगितलं?

रेणू हाऊसवाईफ असून नवरा आणि तीन मुलं असा तिला परिवार आहे. हल्लेखोर आशिष चालत आला व त्याने पॉइंट ब्लँक रेंजमधून गोळी झाडली. प्राथमिक तपासात या हल्ल्यामागे व्यक्तीगत शत्रुत्वाची भावना असल्याच द्वारकाच्या पोलीस उपायुक्तांनी सांगितलं. पोलीस सर्व बाजूंनी या गुन्ह्याचा तपास करतायत. अजून हत्येमागचा नेमका उद्देश स्पष्ट झालेला नाहीय.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close