Uncategorized

पर्यटनासाठी आलेल्या तरुणीचा पाय घसरून दरीत पडल्याने  मृत्यू 

Spread the love

अहमदनगर / नवप्रहार मीडिया 

                      नाताळ (ख्रिसमस) मुळे सलग तीन दिवस सुट्ट्या आल्या आहेत. त्यामुळे अनेक नागरिक या सुट्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटनस्थळी जातात. पण उत्साहाच्या भरात काही जरी चूक झाली तरी ती जीवावर बेतू शकते याची कल्पना नसल्याने पर्यटक नियमांकडे दुर्लक्ष करतात. आणि हीच चूक त्यांच्या जीवावर बेतते. अशीच घटना अहमदनगर जिल्ह्याच्या सांदण दरीत घडली आहे. येथे पिकनिकसाठी आलेल्या एका तरुणीचा पाय घसरल्याने ती दरीत कोसळली आणि तिचा मृत्यू झाला.  ऐश्वर्या खानविलकर (२४ वर्षे) असं या मृत तरुणीचं नाव आहे.

रविवारी सकाळी ११वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. ऐश्वर्या आपल्या मित्र-मैत्रिणींसह सांदण दरी पाहण्यासाठी आली होती. सलग सुट्ट्या असल्याने तिच्या मित्र परिवाराने पिकनिकचा प्लान केला होता. आज सकाळीच ते सांदण दरीजवळ पोहोचले. यावेळी ऐश्वर्याचा पाय घसरला व ती खोल दरीत कोसळली.

दरीत डोकावून पाहताना ही तरुणी खाली पडली. त्यावेळी तिच्या आजुबाजूला तिला पटकन सावरण्यासाठी कोणीच नव्हतं. त्यामुळे ती खोल दरीत कोसळली. बऱ्याच उंचावरून दरीत पडल्याने तिच्या हातापायांना तसेच डोक्याला गंभीर मार लागला व जागीच तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने मुलीचा मृतदेह दरीतून वर काढला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close