अवकाळी पावसाणे शेतकऱ्यांचे लाखो रुपयाची मेहनत व माल पाण्यात
.
आठ ते दहा एकरातील खरबूज सडल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ
घाटंजी तालुका प्रतिनिधी- सचिन कर्णेवार
गेल्या तीन ते चार दिवसापासून सततच्या अवकाळी पावसाने संपूर्ण तालुका धुवून निघाला असून राजूरवाडी शिवारातही वादळी वाऱ्यासह मोठयाप्रमाणात अवकाळी पावसाने झोडपून काढले त्यामुळे राजूरवाडी शिवारातील गट नंबर 173/1 मधे आबीत खान सादिक खान नामक शेतकऱ्याने आपल्या आठ ते दहा एकर शेतात लावलेल्या खरबूजचे पीक संपूर्ण सडल्यामुळे लाखोचे नुकसान झाले आहे त्यामुळे या शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.अगोदरच तालुक्यातील शेतकऱ्यांचा कापूस हेच प्रमुख पीक असून कापसावर्ती होणारा खर्च आणि त्याला मिळणारा बाजार भाव कमी असल्यामुळे ते पीक शेतकऱ्यांना फरवडणारे नसल्याने शेतकरी कापसाला पर्याय म्हणून इतर पीक घेण्याचा प्रयत्न करतो पण, निसर्गाच्या प्रकोपाने शेतकरी आज हवालदील झाला आहे. शेतकऱ्यांचा या महागाईच्या जमान्यात कोणी वाली उरला नाही. शेतकरी दिवस रात्र शेतात राबराब राबून पीकवितो पण, त्याच्या पिकाला योग्य तो भाव मिळत नाही आज शेतीला लागणारे बी बियाणे,रासायनिक खते, कीटक नाशके, तणनाशके आणि मजुराची मजूरी वाढल्यामळे आणि शेतमालाला मिळणारा कमी दर यामुळे शेती करणे शेतकऱ्याला न परवडणारे आहे.शेतकऱ्याला पर्यायी उद्योग धंदे नसल्याने नाईलाजाने शेतीच करावी लागते अशा शेतकऱ्यावर शासनाचा होणारा दुर्लक्ष आणि निसर्गाच्या प्रकोपाने शेतकरी मेटाकुतीस आला आहे. आता या अवकाळी पावसाने झालेल्या शेत मालाची नुकसान भरपाई शासनाकडून मिळावी अशी शेतकऱ्याने मागणी केली आहे.