वरुड शहरात घातक हत्यार बाळगून दहशत निर्माण करणारे आरोपी वरुड पोलिसांच्या ताब्यात
प्रतिनिधी मुबीन शेख.
चांदुर बाजार
पोलीस स्टेशन वरुड अंतर्गत दि. ११/०५/२०२३रोजी गोपनीय बातमी दाराकडुन मिळालेल्या माहीती नुसार वरुड शहरातील नया दायरा भागात काही संशयीत इसम दखलपात्र स्वरुपाचा गंभीर गुन्हा करण्याचे उददेशाने घातक हत्यारे बाळगुन दहशत पसरवित आहे व काहीतरी अशा माहीती वरुन पोलीस स्टेशन वरुडचे ठाणेदार प्रदिप चौगावकर पोलीस निरीक्षक यांनी सदर खबरेबाबत मा.अविनाश बारगळ पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रामीण. मा. शशीकांत सातव अपर पोलीस अधिक्षक अमरावती ग्रामीण, मा.निलेश पांडे उपविभागीस पोलीस अधिकारी उपविभाग मोर्शी यांना माहीती देवुन पोलीस स्टेशन वरुड चा पोलीस स्टाफ चे पोलीस उपनिरीक्षक . धिरज राजुरकर, राजु मडावी. पोलीस अंमलदार राजकुमार डिहीये.राजु चव्हाण.विनोद पवार. सचिन भगत समीर धांडे.प्रफुल लेव्हरकर किरण गावंडे, योगेश ढंगारे , रामेश्वर इंगोले , विशाल सुर्यवंशी ,चालक अंमलदार राजु पडघामोल , कैलास हटवार यांना खबरेच्या सत्यतेबाबत पडताळणी करीता रवाना केले असता पोलीस स्टाफनी नया दायरा परीसरात सापळा रचुन संशयीत इसम १) दिलेर शहा उमर शहा वय २८ वर्ष रा. नया दायरा, २) बाबा शहा उर्फ सोहेल शहा उमर शहा वय २१ वर्ष रा. नया दायरा, ३) वान्टेड ऊर्फ सादिक शहा बब्बु शहा वय २५ वर्ष रा. नया दायरा वरुड यांना ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यातुन दोन धारदार तलवारी व एक धारदार चाकु पंचासमक्ष ताब्यात घेवुन त्यांचे विरुध्द शस्त्र कायदयानुसार कारवाई करण्यात आली. त्यामुळे वरुड पोलीसांचे सतर्कतेमुळे शहरात होणारा अनर्थ टळला.