सामाजिक

दवलामेटी लावा रोड वर कंटेनर उलटला.

Spread the love

ट्रक चालक थोडक्यात बचावला.

वाडी (प्र)
आज शुक्रवार ला पहाटे सव्वा तीन वाजता सुरत कलकत्ता वरून 700 ते 800 पार्सल घेऊन येत असणारा कंटेनर (आयसर ) आर जे 14 जी ओ 5103 दवलामेटी लावा रोड वर विवेकानंद नगर जवळ वळण मार्गा वर उलटाला थोडक्यात ट्रक चालक बचावला. कंटेनर शॅडो फॅक्स, लावा या कंपनीत जात असताना हि घटना घडली.
परिसरातील नागरिक सीमा परिहार, विनोदकुमार शर्मा यांनी सांगितले कि या धोक्याचा वळणावर वर दोन्ही बाजूने ब्रेकर ची गरज अधिक आहे हे वळण धोक्याचे असल्याने नेहमी इथे अपघात होत असतात तसेच स्ट्रीट लाईट पण नसल्याने रात्री ला नवीन व्यक्ती इथे गोंधळतो. तरी प्रशासनाने इथे ब्रेकर व स्ट्रीट लाईट ची वयवस्था करावी अशी मागणी यावेळी दवलामेटी चा माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्या रिता उमरेडकर, रक्षा सुखदेवे, प्रकाश मेश्राम वामन वाहने, श्रीकांत रामटेके, रोहित राऊत, स्वप्नील चारभे, दीपक कोरे, रईस डोंगरे, दर्शन बेले, अन्वर अल्ली, मधुकर गजभिये, माधुरी खोब्रागडे, जोत्सना बेले, प्रीती वाकडे व इतर नागरिकांनी केली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close