
नवी दिल्ली / नवप्रहार मीडिया
जगात अश्या काही घटना घडत असतात की सहजच असं ही होतेय का ? हा प्रश्न मनाला पडतो. आता याच प्रकरणात पहा न ! नवरा बायको सोबत झोपला म्हणून त्याला सोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा झाली. समाजाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर नवरा बायकोला एकत्र झोपण्याची परवानगी असते. पण या प्रकरणात मात्र उलटच घडलं. बायको सोबत झोपणाऱ्या नवऱ्याला दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
चला तर जाणून घेऊ या विचित्र प्रकाराबद्दल , समंथाला तिच्या वडिलांशी भेटायचे असल्याने समंथाने तिच्या आईला तीन वर्षांपूर्वी आपल्या वडीलांबद्दल विचारले होते. समंथा कडून वारंवार ही मागणी होत असल्याने तिच्या आईने तिला तिच्या वडिलांचे नाव फिलग्रोव्ह असल्याचे सांगितले होते.
अमेरिकेतील ही घटना. ट्रॅव्हिस फील्डग्रोव्ह आणि समंथा केर्शनर हे दाम्पत्य. 40 वर्षांचा ट्रॅव्हिस आणि 21 वर्षांची समंथा यांचं लग्न 1 ऑक्टोबर रोजी नेब्रास्कातील हेस्टिंग्जमध्ये झालं. दोघंही विवाहित, नात्याने पती-पत्नी. पण तरी ट्रॅव्हिसला सामंथासोबत शारीरिक संबंध ठेवण्याची शिक्षा देण्यात आली. यानंतर फिल्डग्रोव्ह आणि समांथा 3 वर्षे बापलेकीसारखे राहिले. पण हळूहळू त्यांच्यातील संबंध बदलू लागले आणि ते शारीरिक संबंधापर्यंत पोहोचले.
वडील-मुलगीपासून पती-पत्नीपर्यंतचे नातं कसं वाढलं हे दोघांनीही पोलिसांना सांगितलं नाही. मात्र दोघांमध्ये खूप जवळीक निर्माण झाल्याचं तिनं कबूल केलं. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, कर्शनरने पोलिसांना असंही सांगितलं की, तिच्या सावत्र बहिणीसोबत तिच्या वडिलांसोबत कोण झोपणार याची स्पर्धा होती.
दोघांची डीएनए चाचणी केली असता हा प्रकार उघडकीस आला. दोघांचं खरं नातं हे वडील आणि मुलीचंच असल्याचं सत्य डीएनए चाचणीतून समोर आलं. एबीपीने मिररच्या रिपोर्टचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार, फील्डग्रोव्हला त्याच्या मुलीसोबत झोपल्याबद्दल 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.