अकोल्यातुन लवकरच विमान सेवा सूरु होनार
नागरी ऊड्डानराज्यमंञी ना. मूरलीधर मोहळ सोबत खा अनूपजी धोञे सकारात्मक चर्चा
बाळासाहेब नेरकर कडून
अकोला विमानतळावरून लवकरच विमान सेवा सुरू करण्याबाबत नागरिक उड्डाण मंत्री नामदार मुरलीधर मोहोळ यांच्या दालनात आज नवी दिल्ली येथे बैठक होऊन उड्डाण योजनेमध्ये व अकोल्यातून विमान सेवा सुरू होण्याबाबत तांत्रिक बाबी तपासून तातडीने विमान सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा व बैठक घेण्यात बाबत नवनिर्वाचित आणि सत्कारामध्ये व प्रिंट मीडियास इलेक्ट्रॉनिक्स मीडियाची चर्चा करताना अभिवचन दिलेल्या अनुसार खासदार अनुप धोत्रे यांनी आज चर्चा करून विमानतळ सुरू करण्याबाबत सकारात्मक पावले उचलण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केले आहे . व
सकारात्मक अभिवचन नुकतेच देशाचे नागरिक उड्डाण राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिले आहे. अकोला लोकसभा मतदारसंघाचे नवनियुक्त खासदार यांनी नुकतीच नागरी उड्डाण राज्यमंत्री यांची भेट घेऊन विमान सेवा सुरू करण्याबाबत आणि येत असलेल्या तांत्रिक अडचणींबाबत विस्तृत चर्चा केली व यावेळी अकोल्याहुन लवकरच विमान सेवा सुरू करण्याबाबत मंत्री महोदयांनी सकारात्मक अभिवचन दिले असल्याचे खासदार अनुप धोत्रे यांनी सांगितले.
अकोला जिल्हा हा पश्चिम विदर्भातील प्रमुख जिल्ह्यांपैकी एक आहे . 1946 पासून विमानतळ असलेला सांगून
आणि त्याच अनुषंगाने अकोळ्याहून विमान सेवा सुरू करण्याबाबत मागील कित्येक वर्षापासून चर्चा सुरू असून अकोल्याचे नवनियुक्त खासदार अनुप धोत्रे यांनी नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी चर्चा करून ही सेवा सुरू होण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल टाकले आहे.
यावेळी बैठकीत आकोल्याहून दिल्ली,मुंबई,नागपूर आणि बँगलोर करता सेवा सुरू करण्याबाबत चर्चा झाली विमान सेवा पुरविणाऱ्या कंपनी मधील फ्लाईंग बिग एअरलाइन्स चे MD कॅप्टन मंडाविया आणि नागरी उड्डाण मंत्रालयातील अधिकाऱ्यांसमवेत ही बैठक संपन्न झाली असून त्याच बरोबर विमान तळावर करावयाचे बदल आणि तांत्रिक अडचणींबाबत चर्चा झाली व या सर्व बाबी लक्षात घेत सर्व सुविधायुक्त विमानतळा सहित अकोल्याहून विमान सेवा सुरू करण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याचे ही यावेळी खा.अनुप धोत्रे यांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या उडाण योजनेच्या माध्यमातून अकोल्यातील विमान सेवा सुरू करण्याबाबत मागील काळापासून माजी केंद्रीय राज्य मंत्री व खा.संजय भाऊ धोत्रे,स्व.आ.गोवर्धन जी शर्मा,आ.रणधीर भाऊ सावरकर,आ.वसंत खंडेलवाल कार्यरत होते आणि याच अनुषंगाने नवनियुक्त खासदार अनुप धोत्रे यांनी याबाबत एक सकारात्मक पाऊल टाकले असून अकोल्यातील नागरिकांसाठी व अकोल्याच्या औद्योगिक वसाहतीत नवीन उद्योग येण्या साठी विमान सेवा सुरू करण्याबाबत सक्रिय असून लवकरच अकोला वासियांकरता ही सेवा सुरू होणार आहे. याबाबत अधिकारी व तांत्रिक बाबी विमान कंपनी तसेच शासनाचे धोरण यामध्ये लवचिकता आणून मागासलेल्या व शेती उत्पादन असलेल्या जिल्ह्याला प्राधान्य देण्यात यावा अशी मागणी खासदार धोत्रे यांनी करून संत गजानन महाराज शेगाव, तसेच बंजारा समाजाची काशी पोहरादेवी, जवळ असल्यामुळे यात्रेकरूंना सुविधा होऊ शकते व पर्यटन क्षेत्र म्हणून धार्मिक क्षेत्र , आरोग्य क्षेत्रम्हणून शैक्षणिक हब म्हणून हा अकोला जिल्हा प्रसिद्ध असल्यामुळे कृषी तसेच कीटकनाशक शेती रसायनिक वस्तू उपलब्ध असण्याची कारखान्याची लक्षात घेता अकोल्यात विमानतळ ची आवश्यकता कृषी विद्यापीठ या पार्श्वभूमीवर अकोल्याला न्याय देण्यात यावा अशी मागणी खासदार अनुप धोत्रे यांनी केली व अनेक तांत्रिक बाबी व देशभरातील विमानतळांची माहिती हवाई पट्टी तसेच जागेची माहिती अनुप धोत्रे यांनी बैठकीत मांडल्या व या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेऊन अकोल्याला न्याय द्यावा अशी मागणी केली या मागणी संदर्भात ताबडतोब सर्व बाबी तपासून विदर्भाला न्याय देण्यात येईल पश्चिम विदर्भाचा विकास करण्यासाठी सरकार कधी बंद असल्याचे अभिवचन नामदार मोहोळ यांनी दिले