निमखेड बाजार येथे आज यात्रा मोहत्सव
देवीविना नवरात्र उत्सव साजरा
मनोहर मुरकुटे
अंजनगाव सुर्जी.
तालुक्यातील निमखेड बाजार येथे शेकडो वर्षे पूर्वी जयपुरी महाराजांनी जिवंत समाधी घेतली होती.तेव्हापासून सर्व जाती धर्माचे लोक येथे नवरात्र उत्सव साजरा करतात.
येथे नवमीला यात्रा भरते व हजारो लोक महाप्रसादाचा लाभ घेतात, घटस्थापनच्या दिवसा पासून रोज सायंकाळी गावातून दिंडी काढण्यात येते. व रात्री मळीत भजन व मुखवट्याचे सोंग घेऊन येतात मुखवट्याचे सोंग हे पुरातन गोष्टीची आठवण करून देतात. तसेच अष्टमीला गावातून जयपुरी महाराजांची मिरवणूक निघते यामध्ये अकोला व अमरावती जिल्ह्यातील ढोलच्या दिंड्या सहभागी होतात. गावात प्रत्येक घरापुढे रांगोळी काढण्यात येते.गावातील कलाकार रात्रभर मंदिरात जागे राहून मुखवटा लावून लोकांसमोर कला सादर करतात.
_______________________
निमखेड बाजार येथे देवीचीस्थापना होत नाही, या गावात केवळ नवरात्री मध्ये जयपुरी महाराजांची यात्रा भरते.घटस्थापने पासून नऊ दिवस सर्व जाती धर्माचे लोक येतात व महोत्सवात सहभागी होतात.अतिशय शांततेत यात्रा संपन्न होते. दसऱ्याच्या दिवशी मंदिराच्या प्रांगणात सर्व नागरिकांसमोर मंदिराचे विश्वस्त नऊ दिवसांचा हिशोब लोकांपुढे देतात व जुने वाद, तंटे संपल्याचे निश्चित करतात. परस्परांना आलिंगण देऊन मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या जातात.