दर्यापूरच्या श्रावणी’ची कबड्डी स्पर्धेकरीता महाराष्ट्र संघात निवड
(वैष्णवी स्पोर्टिंग क्लब ने केला दर्यापुरात सत्कार)
दर्यापूर (ता.प्रतिनिधी)-दर्यापूर शहरातील वैष्णवी स्पोर्टींग क्लब ची खिळाडू व प्रबोधन विद्यालयाची विद्यार्थिनी कु.श्रावणी संतोष वाट हिची कब्बडी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे बीड जिल्ह्यातील आष्टी येथे नुकत्याच राज्यस्तरीय 17 वर्षआतील शालेय कबड्डी स्पर्धा पार पडल्या.त्यामध्ये दर्यापूरची कु.श्रावणी संतोष वाट हिची चाचणीद्वारे राष्ट्रीय कब्बडी स्पर्धेसाठी राज्य संघात निवड झालीआहे.श्रावणी या आधी पण विदर्भ कबड्डी असोसिएशन चे अध्यक्ष श्री जितेंद्रजी ठाकूर व सह सचिव श्री सतीशराव डफळे सर यांचा मार्गदर्शना खाली अनेकदा राज्य व राष्ट्रीय स्तरावर विदर्भाचा प्रतिनिधित्व केल आहे. सांघिक खेळात शालेय राष्ट्रीय स्पर्धेत खेळणारी श्रावणी ही दर्यापूरची पहिलीच महिला खेळाडू ठरणार आहे.त्या निमित्त ने वैष्णवी स्पोर्ट द्वारे तिचा सत्कार करण्यात आला, त्या वेळे वैष्णवी स्पोर्टिंग क्लब मंडळाचे अध्यक्ष श्री डॉ. अविनाश ठाकरे, अनिल भारसाकळे, सुनील उगले, राजू भाऊ होले, प्रभाकर कोरपे, गणेश साखरे, अन्सार मिर्झा,प्रवीण कावरे,विनोद शिंगने, इंजि. संजय शिंगने , सुमित सावरकर, संजय चौव्हाण, किरण होले, प्रदीप सांगोले, नितीन राहटे, किशोर घाणे,व क्रीडा प्रेमी व इतर खिळाडू उपस्थित होते ती दर्यापूर येथे क्रीडा क्षेत्रात कार्यरत वैष्णवी स्पोटिग क्लबची खेळाडू असून मंडळाचे अध्यक्ष डॉ अविनाश ठाकरे यांच्या मार्गर्शनाखाली व कबड्डी खेळाचे प्रशिक्षक तथा राष्ट्रीय कब्बडीपटू परिक्षीत चिकटे यांच्या मार्गदर्शाखाली ती नियमित सराव करत आहे. तिने आपल्या यशाचे श्रेय आई वडील, विदर्भ कबड्डी असोसिएशन चे अध्यक्ष मा. श्री जितेंद्रजी ठाकूर(भाऊ),सह सचिव श्री सतीश डफळे सर , शाळेचे प्राचार्य,वैष्णवी स्पोर्टींग क्लब व प्रशिक्षक परीक्षित चिकटे यांना दिले आहे.तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून, तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.