विशेष

मद्यधुंद  एसटी चालकास पोलिसांनी घेतले ताब्यात

Spread the love

वेळ सावधतेने प्रवाशांचे वाचले जीव.
यवतमाळ / प्रतिनिधी
मदयधुंद अवस्थेत एस.टी. बस चालविने पडले महाग. २२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या चालकाची जेल
मध्ये रवानगी करण्यात आली.सविस्तर वृत्त असे की दि.२२/०८/२०२३ रोजी सकाळी यवतमाळ ते छत्रपती संभाजी नगर ला जाणारी यवतमाळ आगाराची एस.टी.बस MH ४०CM ५१२१ हि दारव्हा बस स्थानकावरून २२ प्रवाशांसह रवाना झाली या बस मध्ये बालक म्हणुन नारायन मारोती एकुंडवार तर वाहक म्हणुन प्रशांत पांडुरंग भगत असे नेमणुकीस होते. बस दारव्हा येथुन निघुन कारंजा रोडवर ५ किमी अंतरावरील चिखली फाटा येथे पोहचली असता बस वेडी वाकडी धाऊ लागली प्रवाशांनी आरडा ओरड करताच चालकाने बस थांबविली व स्टेअरींग वर त्याने मान टाकली प्रवाशांनी चालकास विचारपुस केली असता तो पुर्णपणे दारूच्या नसेत असल्याचे व त्यास बोलता बघता देखील येत नसल्याचे दिसुन आले. या बाबत वाहक भगत यांनी दारव्हा आगाराला माहीती देताच आगाराच्या अधिका-यानी घटनास्थळी जावुन चालकास ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन ला हजर केले. पोलीस स्टेशन ला देखील चालक नारायन ऐकुंडवार यास निट उभे राहता येत नव्हते. दारव्हा पोलीसांनी चालकाची तात्काळ वैदयकिय तपासणी केली असता चालक नारायन ऐकुंडवार हा पुर्ण पणे मदयाकाचे अमला खाली असल्याचा अभिप्राय डॉक्टर नी दिला २२ प्रवाशांचे जिव धोक्यात आणणा-याला एस.टी महामंडळाचा चालक नारायन मारोती एकुंडवार यांचे
विरूध्द दारव्हा पोलीसांनी भादवि कलम ३०८ प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपी बस चालक नारायन मारोती एकुंडवार यास न्यायालय समक्ष हजर केले असता न्यायालयाने त्याची जेल मध्ये रवानगी केली दारू पिवुन वाहन चालविणा-या चालका विरुध्द भादवि ३०८ प्रमाणे कार्यवाही करण्याची यवतमाळ जिल्हयातील ही पहीलीच घटना असावी दारू पिवुन वाहन चालविल्यामुळे अनेक टॅव्हल्स बस चे अपघात होवुन अनेक प्रवाशांना प्राणास मुकावे लागले आहे. संमुध्दी महामार्गावरील २६ प्रवाशांचा जिव घेणा-या टॅव्हल्स बस चालक देखिल
दारूचे नसेत असल्या बाबत निष्पन्न झाले होते चालकाच्या जेल रवानगी मुळे एस. टी. महामंडळ व खाजगी बस
चालका मध्ये एकच खळबळ उडाली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close