नुकसानग्रस्त पान पिंपरी औषधी पिकाची शेतावर जाऊन तहसीलदार यांनी केली पाहणी

अंजनगाव सुर्जी मनोहर मुरकुटे
गेल्या पाच दिवसा पासून महाराष्ट्र सहीत अंजनगाव सुर्जी तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातले असून आलेल्या अवकाळी पावसामुळे व निसर्गाच्या सततच्या चक्रा मुळे तालुक्यातील पान पिपरी औषधी पीक उत्पादक व कापूस उत्पादक शेतकरी कमालीचा संकटात सापडला आहे.
अंजनगाव सुर्जी तालुक्यात फार मोठ्या प्रमाणात पिकविल्या जाणाऱ्या पान पिंपरी ह्या औषधी पीकाचे अवकाळी पावसामुळे फार मोठ्या प्रमाणात,अतोनात नुकसान झाले
पानपिपरी ह्या औषधी पिकाचे भरवशावरच ह्या भागातील शेतकऱ्याचा उदरनिर्वाह चालत असतो, झालेल्या नुकसाणीमुळे पानपिपरी उत्पादक शेतकरी हा धास्तावून गेला आहे ह्या पिकाचे झालेल्या नुकसानबाबत
त्वरित सर्वेकशन,पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पान पिपरी उत्तपादक शेतकरी व भाजपाचे वतीने तहसीलदार सौं पुष्पा सोळंके ह्यांना निवेदन देण्यात आले होते त्या निवेदनाची तहसीलदार यांनी योग्य दाखल घेऊन नुकतीच शेतावर जाऊन प्रत्यक्ष पान पिपरी उत्पादक शेतकऱ्यांची विदारक परिस्थिती पाहल्ली हयावेळी महसूल मंडळ चे गवई, व त्यांची टीम,शेतकरी मनोहर मुरकुटे, मधुकर गुजर, रविद्र बोडखे,गोविंद भावे , सुभाष भावे, विनायक येऊल, रमेश थोरात, संदीप येऊल, वैभव भावे, प्रतीक बोडखे ई पिंपरी उत्पादक शेतकरी उपस्थित होते.