आर जी देशमुख कृषी विद्यालयात दहीहांडी व वेशभूषा स्पर्धा संपन्न..
आर.जी. देशमुख कृषी विद्यालयात श्रीकृष्ण जन्माष्टमी संपन्न……
वाठोडा (प्रतिनिधी)
वरुड तालुक्यातील वाठोडा येथील आर.जी. देशमुख कृषी विद्यालयात श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी व गोपाल काल्याचे आयोजन करण्यात आले होते.
या निमित्त आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य व्ही.एम.खुळे सर होते,तर प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक एस. एन. राऊत सर, जी.प.शाळा वाठोडा येथील शिक्षिका सौ.राऊत मॅडम, तसेच पालक प्रतिनिधी म्हणून बंडूजी गावंडे व रणजीत झोडे, सौ.कविता ताई पराळे ,सौ.मीनाताई बोंदरकर,सौ.शेळके,श्रीमती झोडे , सौ. सुनंदाताई धोटे, सौ कविताताई कोसे ई. प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
या निमित्ताने आयोजित वेशभूषा स्पर्धेमध्ये विजेत्या स्पर्धकांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले,त्यामध्ये कृष्णाच्या वेशभूषेमध्ये प्रथम प्रशिक शेळके, द्वितीय गौरव कुबडे, तृतीय हर्षल सुरजुसे तसेच राधाच्या वेशभूषेमध्ये प्रथम दिव्या गावंडे, द्वितीय सोनाली वागद्रे, तृतीय लक्ष्मी ढोमणे, प्रोत्साहनपर बक्षीस रुचीता बाडे,तनुजा यावले यांना देण्यात आले. वेशभूषा स्पर्धेचे परीक्षण कलाशिक्षक एस पी काळे सर यांनी केले
वर्ग पाच, सहा व सातवीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे संचालन कु.राजश्री काळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार कु. नीलिमा फुसाम यांनी मानले.
जी. जी. देशमुख सर,सौ करूनाताई बोडखे, कु. राजश्री काळे, सौ.अर्चना भोयर,कु. नीलिमा फुसाम,सौ.अपर्णा राऊत या शिक्षकांनी कार्यक्रमाचे नियोजन करून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.