Uncategorized

दगडाने ठेचून हत्या : बिबट्याच्या हल्यात मृत्यू झाल्याचा बनाव पण पोलियांनी हेरल 

Spread the love

दौंड / नवप्रहार ब्युरो

                  खुरपणीसाठी शेतात गेलेल्या काकूची पुतण्याने मित्राच्या साह्याने दगडाने ठेचून हत्या केली. आणि बिबट्याच्या हल्ल्यात तिचा मृत्यू झाल्याचा बनाव रचला. वनविभागाला या स्टोरी वर विश्वास नव्हता.म्हणून त्यांनी मृत महिलेच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करुन वन विभागाच्या नागपूरमधील प्रादेशिक न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत त्याची तपासणी करण्याकरिता पाठवला. आणि सत्य समोर आलं.घटना दौड तालुक्यातील वरवंड येथील आहे.

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, दौंड तालुक्यातील वरवंड आणि कडेठाण गावच्या शिवेवर असलेल्या कडेठाण हद्दीमध्ये 7 डिसेंबर 2024 ला शेतात काम करणाऱ्या लताबाई बबन धावडे यांच्यावर बिबट्यानं हल्ला केला होता. त्या महिलेला उसाच्या शेतात बिबट्याने फरफटत नेल्याचा प्रथमदर्शनी पोलिसांना वाटलं. या हल्ल्यात लता धावडे यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा दावा त्यावेळी तक्रारदार पुतण्या अनिल पोपट धावडेने केला होता. पोलीस आणि वन विभागाचे जबाबदार अधिकारी घटनास्थळी दाखल होण्यापूर्वीच त्यांचा मृतदेह घटनास्थळावरुन हलवला गेला होता.

तर वन विभागाने हा वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला नसल्याची शंका व्यक्त पूर्वीच केली होती. मृत महिलेच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करुन वन विभागाच्या नागपूरमधील प्रादेशिक न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत त्याची तपासणी करण्यात आली. मृत महिलेच्या शरीरावरती कोणत्याही वन्य प्राण्यानं हल्ला करून मृत्यू झाला नसल्याबाबतचा प्रादेशिक न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा अहवाल पोलिसांनी दिला. त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केला असता धक्कादायक खुलासा झाला. आरोपींनी अनैतिक संबंधाच्या संशयातून लता धावडे यांना मारण्याचा कट रचला होता. पुतण्याने काकूचा दगडाने मारून खून केल्याचा पोलीस तपासात समोर आलं.

खुरपण्यासाठी शेतात गेल्या अन्…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लता धावडे या गवत खुरपण्यासाठी शेतात गेल्यानंतर त्यांना सतिलाल यानं बाजुला बोलावलं. आपल्या पुतण्याच्या घरी काम करणारा व्यक्ती असल्यामुळे त्या त्याच्यासोबत बांधावर गेल्या. त्यावेळी त्यांंचं तोंड दाबून त्यांना बेशुद्ध केलं. त्यानंतर मग मुख्य आरोपी पुतण्या त्या ठिकाणी आला. या दोघांनी मिळून दगडानं ठेचून महिलेची हत्या केली. त्यानंतर बिबट्याचा हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला असा बनाव रचला. एवढंच नाही तर वनविभागाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही केली. मात्र, अखेर पोलीस तपासात पुतण्याचं बिंग फुटलं असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत…

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close