दादर चे 2 स्लीपर कोच आजपासून होणार कमी

आता 8 ऐवजी असणार 6 स्लीपर
नागपूर / वांज प्रतिनिधी
नागपूर ते CMST आणि CMST ते नागपूर दरम्यान धावणाऱ्या सेवाग्राम एक्सप्रेस ( दादर) चे स्लीपर चे दोन कोच आजपासून कमी जाणार आहे. आता या गाडीत 8 ऐवजी 6 स्लीपर कोच असणार आहे. या गाडीत एलएचबी कोच 25 मे पासून राहाणार आहे. त्यामुळे एकीकडे काही प्रवाशांची सोय तर काहींची गैरसोय होणार आहे.
सध्याच्या घडीला सेवाग्राम एक्सप्रेसमध्ये 8 स्लीपर कोच आहेत, मात्र आता स्लीपर कोचची संख्या 6 होणार आहेत. तर स्लीपर कोचचे आरक्षण न मिळाल्यास एसी-3 कोचच्या डब्ब्यातून प्रवास करावा लागणार आहे. अशावेळी पर्याय नसल्याने एसी-3 कोचचे प्रवास भाडे द्यावे लागणार आहे. प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्यात,यासाठी मध्य रेल्वेने एसी-3 कोचच्या संख्येत वाढ केल्याची माहिती रेल्वेच्या अधिकार्यांनी दिली आहे.
एलएचबी कोचसह धावणार
मध्यवर्ती नागपूर स्थानकावरुन सुटणारी ट्रेन क्रमांक 12140 नागपूर-सीएसएमटी (मुंबई ) Sevagram Express सेवाग्राम एक्स्प्रेसचा पहिला रेक 25 मे रोजी नागपूरहून एलएचबी कोचसह धावणार आहे. तर 12139 सीएसएमटी (मुंबई ) -नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस 26 मेपासून धावेल. नागपूरहून मुंबईला जाणार्या गाड्यांमध्ये सेवाग्राम एक्स्प्रेसही महत्त्वाची आहे, मात्र आतापर्यंत या ट्रेनमध्ये आयसीएफ डबे होते. त्यामुळे दुरांतोपेक्षा कमी सोयीस्कर आहे. इतरांपेक्षा या ट्रेनने इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी जास्त वेळ लागत होता. मात्र आता असे होणार नाही, यामध्ये एलएचबी कोच लागल्याने या ट्रेनमधून प्रवास करणार्या प्रवाशांना सुविधा मिळणार आहे.
सेवाग्रामचा वेग वाढणार
Sevagram Express : यात 22 डबे राहणार असून एसी-3 टायर इकॉनॉमी, 6 स्लीपर क्लास, 3 जनरल सेकंड क्लाससह गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर व्हॅन राहणार आहे. एलएचबी कोच हे जर्मनीतून आणली आहे. कपूरथळा, चेन्नई आणि रायबरेली येथील रेल्वे कोच कंपणीतून हे कोच तयार झाले आहे. एलएचबी कोच लांब असल्याने प्रवाशांची सोय होणार आहे. कोच हलका असल्याने वेग जास्त असेल. अपघातानंतर डबे एकमेकांवर चढत नाहीत, तसेच यात बायो टॉयलेट बसविले आहे.