सामाजिक

डाबकी रोड उड्डाणपूल १ऑगस्ट रोजी होणार जनतेसाठी खुला

Spread the love

अकोला। / प्रतिनिधी
तेल्हारा , शेगाव व बुलढाणा जिल्ह्याला जोडणारा शहरातील महत्वाचा डाबकी रोड उड्डाणपूल १ ऑगस्ट २०२३ रोजी जनतेच्या सेवेत लोकार्पण होणार असल्याची माहिती आमदार रणधीर सावरकर यांचे उपस्थितीत रेल्वे व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बैठकीत करण्यात येऊन न्यू तापडिया नगर उड्डाणपूलाचे काम १३ मे पासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.
खासदार संजयभाऊ धोत्रे यांनी केंद्र सरकार कडे पाठपुरावा करून डाबकी रोड उड्डाणपूल योजना मंजूर करून आणली परंतु खर्च वाढल्यामुळे व निधी संपल्यामुळे काम थांबले होते. रेल्वे व सार्वजनिक बांधकाम विभाग यांचा आपसी करार न झाल्यामुळे काम रखडले होते या संदर्भात आमदार रणधीर सावरकर यांनी सतत खासदार संजयभाऊ धोत्रे यांचे मार्गदर्शनात पाठपुरावा करून ना नितीन गडकरी व राज्याचे उप मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस याचे माध्यमातून १९ कोटी रुपये निधी राज्यसरकार कडून आणून रेल्वे गेट वरील उड्डाणपुलासाठी रेल्वे विभागाकडे जमा केले. व त्याचे काम ७५ % पेक्षा जास्त झाले असून १३ व १५ मे रोजी स्वतः मेघा ब्लॉक घेऊन कामाला गती देण्याचे काम देण्यात आहे.
या संदर्भात बैठक होऊन रेल्वे अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्त दौरा करून या पुलाच्या खालून अंडरपास पूल निर्माण करण्याचे प्रस्तावित करण्यात आले असून येत्या २५ मे रोजी या संदर्भात महत्वाची बैठक होऊन रेल्वे तांत्रिक विभाग बजेट व डिझाईन ला मान्यता देण्यात येत असून या संदर्भात राज्य शासनाकडून आ रणधीर सावरकर यांचे कडून वारकरी तसेच पादचारी व दुचाकी वाहनांसाठी अंडर पाससाठी राज्याचे मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री यांचेकडे पाठपुरावा करून जनतेच्या सोयीसाठी निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे जनतेला दिलासा मिळणार आहे. १ ऑगस्ट पूर्वी या रेल्वे पुलाचे काम रेल्वे विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग पूर्ण करून जनतेला समर्पित करण्याचा निर्णय व सूचना आमदार रणधीर सावरकर यांनी दिल्या.
न्यू तापडिया नगर येथील उड्डाणपुलाचे काम १३ मे ला सुरु होणार व २ अंडर पास प्रस्तावित
शहरातील नवीन वस्ती उमरी, जवाहर नगर, रामदास पेठ, सावंतवाडी या भागातील नागरिकांना न्यू तापडिया नगर, खरप तसेच आपातापा, म्हैसंग मार्गे दर्यापूर, अमरावती, नागपूर आदी ठिकाणी जाण्यासाठी सोय व्हावी तसेच शहरातील या उपनगरला न्यू तापडिया नगर रेल्वे गेट मुळे नागरिकांना वाहना गणेऊ दीड ते दोन तास उभे राहावे लागत होते. या जनतेच्या समस्या नीराकारणासाठी खा. संजयभाऊ धोत्रे व आमदार रणधीर भाऊ सावरकर यांची मागणी लक्षात घेता विकास पुरुष ना नितीन गडकरी यांनी या पुलाकरिता निधी उपलब्ध करून दिला. परंतु उड्डाणपुलाचे डिझाईन व रेल्वे विभागामुळे नियमांमुळे नवीन नियम प्रमाणे नवीन रेल्वे गेट वरील पुलाला जोडणारा मार्गाचा खर्च वाढल्यामुळे राज्यातील सत्तांतर झाल्यामुळे महाविकास आघाडीच्या काळात काम थांबले होते आ रणधीर सावरकर यांनी राज्याचे उप मुख्यमंत्री व अर्थ मंत्री ना देवेंद्र फडणवीस यांचेकडे पाठपुरावा करून ५० कोटी रुपये खर्च वाढल्यामुळे रेल्वे विभागाकडे २२ कोटी रुपये निधी उपलब्ध करून रेल्वे विभागाकडे निधी हस्तांतरित केल्यामुळे १३ मे पासून संबंधित कंपनीला कामाचे आदेश देण्यात आले असून राज्यातील मेट्रो रेल्वे करिता उपयोगी पडेल असा उड्डाणपूल निर्मितीचे काम या नकाशात प्रस्तावित करण्यात आले आहे. या पुलाखाली २ अंडर पास व बजेट डिझाईन याला २५ मे रोजी रेल्वे प्रशासन मंजुरी देणार आहे. व लागणारा निधी व उड्डाणपुलाचा उर्वरित २८ कोटी रुपये निधी राज्य शासनाकडून उपलब्द करून घेण्याचे दृष्टीने आमदार सावरकर खासदार संजयभाऊ धोत्रे यांनी जनतेला दिलेल्या शब्दाची पूर्तता करणार आहे.
या कामाला गती देण्यासाठी न्यू तापडिया नगर परिसराची साफसफाई व बांधकाम संदर्भात आखणीचे काम सुरु झाले आहे. या जागेची पाहणी व संपूर्ण माहिती आ रणधीर सावरकर यांनी समजावून घेतली. या वेळी रेल्वे विभागाचे अधीक्षक अभियंता भालेकर, अभियंता देशपांडे, उप अभियंता थावरे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सरनाईक, उप अभियंता राठोड, या वेळी उपस्थित होते तर आमदार रणधीर सावरकर यांचे समवेत रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य वसंत बाछुका, शेतकरी नेते विवेकभाऊ भरणे, गिरीश जोशी आदी उपस्थित होते.
आमदार सावरकर यांचे प्रयत्नाने ग्रामीण आणि शहरी भागाला जोडणारे पूर्व आणि पश्चिम भागातील उड्डाणपुलाला निधी प्राप्त होऊन कामाला सुरुवात झाली आहे या मुले दळणवळण सोबत वेळेची बचत, आर्थिक बचत होणार आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close