विकृतीचा कळस , त्याने श्वानासह गाय आणि इतर प्राण्यांवर केले लैंगिक अत्याचार

कानपुर / नवप्रहार मीडिया नेटवर्क
जगात काही गोष्टी अश्या घडतात की त्यावर सहसा विश्वास बसत नाही. पण परिस्थितीजन्य पुराव्या नंतर त्यावर विश्वास करावाच लागतो. आता हेच बघा ना ! पोलिसांना सीसीटीव्ही तपासताना जे आढळले त्यामुळे पोलीस देखील अचंभीत आहेत. या 63 वर्षीय व्यक्तीने जे केले त्याला विकृतीचा कळस एव्हढेच म्हणता येईल. या वयस्कर व्यक्तीने श्वाना सह अन्य प्राण्यांवर लैंगिक अत्याचार केले आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
बर्रा या परिसरात ही घटना घडली आहे. पोलीस उपायुक्त (दक्षिण) रवींद्र कुमार यांनी सांगितलं आहे की, अटक करण्यात आलेल्या व्यक्तीची ओळख पटली आहे. विजेंद्र मिश्रा असं या 62 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीला अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलीस उपायुक्तांच्या माहितीनुसार, आरोपीविरोधात भारतीय दंड सहिता कलम 377 (अनैसर्गिक संबंध) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने याआधीही अशा प्रकारचं कृत्य केलं आहे. त्याच्याविरोधात याआधीही असे गुन्हे दाखल करण्यात आले होते.
सहपोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) आनंद प्रकाश तिवारी यांनी सांगितलं आहे की, “पोलीस तपासादरम्यान आम्हाला अनेक सीसीटीव्ही फुटेज मिळाले ज्यामध्ये आरोपी विजेंद्र मिश्राने सार्वजनिक ठिकाणी जनावरांवर लैंगिक अत्याचार केल्याचं दिसत आहे. प्राथमिकदृष्ट्या आरोपी मानसिकरित्या आजारी असल्याचं दिसत आहे. त्याची वैद्यकीय तपासणी करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे”.
पाळीव कुत्र्यासह दुष्कृत्य
याआधी बुलंदशहर शहरातूनही असं प्रकरण समोर आलं होतं. येथे एका 65 वर्षाच्या वयस्कर व्यक्तीने पाळीव कुत्र्यासह दुष्कर्म केलं होतं. पाळीव कुत्र्यासह दुष्कर्म केलं जात असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. कुत्र्याचा मालक प्रेमचंद वर्मा उर्फ बबलीने कोतवली पोलीस ठाण्यात पोहोचत वयस्कर व्यक्तीविरोधात तक्रार केली होती. यानंतर आरोपी अनिल शर्मा याला अटक करत कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यानंतर त्याची रवानगी जेलमध्ये करण्यात आली होती.