क्राइम

क्रूरतेचा कळस ;  तरुणीवर बलात्कार करून प्रायव्हेट पार्ट मध्ये ब्लेड आणि दगड टाकले

Spread the love
मुंबई / नवप्रहार डेस्क 

                 देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या मुंबईत क्राईम देखील मोठ्या प्रमाणावर घडतात. येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वसई बीचवर एका अज्ञाताने 20 वर्षीय मुलीवर लैगिंक अत्याचार केला आहे. अत्याचारानंतर पीडित तरुणी बीचवरच रडत बसली होती. तरुणीला बीचजवळील परिसरात रडताना पाहून काहींनी या घटनेची माहिती वनराई पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी पीडित तरुणीचा विचारपूस केली असता तिच्यावर बीचवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. अश्या गजबजलेल्या ठिकाणी ही  घटना घडलीच कशी असा  प्रश्न जनतेसह पोलिसांना देखील पडला आहे.
खरं तर, वसई बीच हा तसा गजबजलेला परिसर असतो. इथे अनेक पर्यटक फेर फटका मारण्यासाठी येत असतात, अशा गजबलेल्या ठिकाणी एका 20 वर्षांच्या तरुणीवर अशाप्रकारे अत्याचार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीवर बलात्कारासह इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. वनराई पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. त्यासाठी आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी 20 वर्षीय पीडित तरुणी 22 जानेवारी रोजी वसई बीचवर फिरायला गेली होती. यावेळी एका अज्ञात व्यक्तीने तिच्यावर बळजबरी करत लैंगिक अत्याचार केला. अत्याचार केल्यानंतर पीडित तरुणी गोरेगाव ई रेल्वे स्थानकाजवळ बसून रडत होती. यावेळी याच परिसरातून जाणाऱ्या एकाने पीडित तरुणीला रडताना बघितलं आणि याची माहिती वनराई पोलिसांना दिली.
घटनेची माहिती मिळताच वनराई पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पीडित तरुणीची विचारपूस करत तिला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. पीडित तरुणीची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये एक ब्लेड आणि दोन दगड आढळले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. पीडितेनं दिलेल्या माहितीनुसार, पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
2
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close