पोलीस स्टेशन दर्यापूर अंतर्गत गुन्हेगार व्यक्ती तडीपार
दर्यापूर — कैलास कुलट
दर्यापूर पोलीस स्टेशन अंतर्गत
ग्राम आमला येथील निलेश जयसिंग
कळसकर वय ३१ वर्ष हा अवैधरित्या
दारू विक्री करतो तसेच सामान्य
नागरिकांना मारहाण करून दहशत
पसरविण्याचे कृत्य करीत असल्याने
तसेच सदर व्यक्तीविरुद्ध पोलीस
स्टेशन दर्यापूर येथे मोठ्या प्रमाणात
महाराष्ट्र दारूबंदी कायदा तसेच शरीर
विरुद्धचे गुन्हे दाखल असल्याने त्याचे
विरुद्ध मुंबई पोलीस अधिनियम
कलम ५६ प्रमाणे कारवाई बाबतचा
प्रस्ताव उपविभागीय अधिकारी
दर्यापूर यांचे मार्फतीने मंजूर करून
सदर आरोपीस अमरावती जिल्ह्यातून
एक वर्षाकरिता तडीपार करण्यात
आले आहे.
सदरची कारवाई अविनाश
बारगळ पोलीस अधीक्षक, अमरावती
ग्रामीण, शशिकांत सातव पोलीस
उपअधीक्षक, गुरुनाथ नायडू
उपविभागीय पोलीस अधिकारी
दर्यापूर, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस
निरीक्षक संतोष आर ताले व पोहेका
रमेश भुजाडे नापोका अमित वानखडे
पोका सूर्यकांत कांदे यांनी पार पाडली.