क्राइम

कथित मजनुवर विनयभंग आणि सायबर क्राईम कलम अंतर्गत गुन्हा दाखल 

Spread the love
अमरावती / प्रतिनिधी
                  सोबत शिकेलेल्या मैत्रिणीच्या इन्स्टाग्राम अकाउंट वर तिचे अश्लील फोटो पाठवण्याची धमकी देत आणि तिच्या नावाने बनावट खाते उघडून तिच्या नातेवाईकांना रिक्वेस्ट पाठवणाऱ्या तरुणाच्या विरोधात पीडितेच्या तक्रारी वरून  दत्तापुर ठाण्यात विनयभंग आणि सायबर क्राईम कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
              साहिल काकडे, घुईखेड असे आरोपीचे नाव आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारी नुसार ती चांदुर रेव्ह येथे राहते.आणि धामणगाव रेल्वे येथील आदर्श महाविद्यालयात शिक्षण घेते. मागच्या वर्षी तिने चांदुर रेल्वे येथील पीपल्स सी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट येथे एम एस सीआयटी कोर्स करण्यासाठी प्रवेश घेतला होता.त्याठिकाणी आरोपी साहिल काकडे हा सुद्धा शिकायला होता. त्यामुळे पीडिता आरोपीची ओळख होती.
                       साहिल याने पीडितेच्या मोबाईल वर आज सकाळी 10 .02 वा. मोबाईल क्र.8856875680 या वरून मॅसेज टाकून मी तुझ्या नावाने इन्स्टग्राम वर खाते उघडून त्यावर तुझे आणि माझे सेक्स चे फोटो टाकले आहेत. आणि याच खात्यावरून तुझ्या नातेवाईकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आहे असा मॅसेज टाकला. तसेच पीडिता ही धामणगाव रेल्वे येथे आदर्श महाविद्यालय येथे येऊन वर्गात बसली असता. तू  माझ्या सोबत बोलत का नाही मी तुझे मोर्फ केलेले फोटो इन्स्टाग्राम वर टाकेल असे धमकावले. साहिल याने नातेवाईकांना फ्रेंड रिक्वेस्ट देखील पाठवल्याचे समजते.
               साहिल काकडे याच्या त्रासाला कंटाळलेल्या पीडितेने दत्तापुर ठाण्यात येऊन तक्रार दिल्याने साहिल याच्यावर भादवी कलम 354 , माहीती तंत्रज्ञान अधिनियम 66 (ड) 67 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close