सालेबर्डी ( खैरी) येथील नाल्यात युवकाचे प्रेत तरंगताना आढळले
जवाहरनगर ‘- परिसरातील सालेबर्डी ( खैरी) ते
कोरंभी रस्त्यावरील पंडित नाला पुलाखालील पाण्यात युवकाचे प्रेत तरंगताना आढळले.असल्याची घटना आज ११.४५ मिनिटांनी उजेडात आली.
सालेबर्डी ( खैरी) येथील उप सरपंच जितेंद्र कार्तिक गजभिये आपल्या मोटासायकल नी कामानिमित्त कोरंभी मार्ग भंडारा येथे जात होते लघुशंके करिता कोरंभी रस्त्यावरील पंडित नाला येथे थांबले असताना पुलाखालील पाण्यात युवकाचे प्रेत तरंगताना दिसून आले या घटनेची माहिती सालेबर्डी ( खैरी) येथील पोलिस पाटील हिरालाल पुडके व तमुस अध्यक्ष टोमदेव तीतीरमारे रयांचे सह जवाहरनगर ठाणेदार यांना फोन द्वारे माहिती दिली.
घटना स्थळी पोलिस आले असता,पोलिस पाटील हिरालाल पुडके व तमुस अध्यक्ष टोमदेव तीतीरमारे, उप सरपंच जितेंद्र गजभिये व नावाळी यांनी डोंग्याचे साह्याने सदर प्रेत बाहेर काढले त्यावेळी या युवकाचे हात पाय दोरीने बांधले असून गळ्यात दुप्पटा व मानेवर , पोटावर जखमा आढळून आले आहेत.
मृतक नयन मुकेश खोडपे वय २३वर्ष रा. पांढराबोडी असी त्याची ओळख पटली असून २७ तारखेपासून घरून बेपत्ता असल्याने तशी तक्रार वरठी पोलिस ठाण्यात दाखल असल्याने.त्यावरून मृतक युवकांच्या नातेवाईकांना बोलावून ओळख पटल्यावर उत्तरीय तपासीसाठी मृतकाचे प्रेत जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे नेण्यात आले.
घटना स्थळी जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतांनी,अतिरिक्त पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे , ठाणेदार सुधिर बोरकुटे यांनी भेट दिली.नातेवाईकानी घटना स्थळी दिलेल्या माहिती प्रमाणे नयन यांची प्रेमप्रकरणातून हत्या करण्यात आली असल्याचे बोलले गेल्याने,या प्रकरणाचे तपास त्या दिशेने करण्यात येईल असे ठाणेदार सुधिर बोरकुटे यांनी माहिती दिली असली तरी पूढील तपास पो. हे.मंगल कुथे करीत आहेत.
……………