राजकिय

माकप तालुका बैठकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्याचा निर्धार

Spread the love

 

. वर्धा मतदार संघात भाजपचा पराभव करा माकप चे जनतेला आवाहन..

असांविधानिक निवडणूक रोख्यातुन कोट्यवधीचा भ्रष्टाचार करणाऱ्या भाजपला हरविण्याचे माकपचे जनतेला आवाहन
_____________________
*नांदगाव खंडेश्वर : प्रदिप रघुते* नांदगाव खंडेश्वर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष कार्यालय येथे दि.14 एप्रिल रोजी झालेल्या तालुका पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये वर्धा लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अमर शरद काळे यांना विजयी करण्याचा निर्धार करून झंजावती प्रचाराला सुरुवात करण्यात आली. अपारदर्शक असंविधनिक निवडणूक रोखे ( electoral bond ) चा कायदा करून भाजप सरकारने प्रचंड भ्रष्टाचार करून कोट्यवधी रुपयांचा विविध कंपन्यांना मलिदा देल्याचे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशातुन उघड झाले आहे. देशातील जनतेकडून कराचा रूपाने जमा झालेल्या धनाचा गैरवापर करून भांडवलदारांना नफा देण्याचे काम भाजपचा मोदी सरकारने केले आहे. भाजपने त्याच सोबत अनेक भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या पक्षात घेऊन महा भ्रष्टाचारी पक्ष असल्याचे दाखवून दिले आहे. तेव्हा जनतेने असा ह्या भ्रष्टाचारी पक्षाला ह्या लोकसभा निवडणुकीत पराभव करून इंडिया आघाडीचा उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन दिनांक 14 एप्रिल रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तालुका पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये करण्यात आले.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष येत्या लोकसभा निवडणुकीत शेतकरी, शेतमजूर, कामगार, दलीत, आदिवासी, महिला, युवक व विद्यार्थी विरोधी धोरणे घेऊन कायदे करणाऱ्या भाजपला पराभव करण्याचे सुद्धा आवाहन ह्या निमित्ताने करण्यात आले आहे.
वर्धा लोकसभा मतदार संघात भाजपचा उमेदवाराचा पाडाव करून इंडिया आघाडीचे उमेदवार अमर शरद काळे,यांना प्रचंड बहुमताने निवडून आणून देशात लोकशाही, संविधान व देश वाचवावे असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष जनतेला करते आहे. यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कमिटी सदस्य कॉ. सुभाष पांडे, जिल्हा सचिव माकप कॉ. रमेश सोनुले. जिल्हा कमिटी सदस्य,तालुका सचिव माकप कॉ.श्याम शिंदे, शहर सचिव माकप कॉ. मोहसीन शेख, कॉ. रामदास मते. कॉ. अनिल मारोटकर, कॉ. विजय पाटील कॉ. दीपक अंबाडरे, कॉ. विजय सहारे, कॉ. केसरखाने, कॉ. ज्ञानेश्वर शिंदे, कॉ. दिलीप मह्हले, कॉ. कांतेश्वर पुंड, कॉ. राजेंद्र राऊत, कॉ. शहंशाह पठाण,कॉ. विशाल शिंदे, कॉ. चैतन्य साळवन कॉ. अंकेश खंडारे,यासह माकप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close