माकपच्या शिष्टमंडळाने घेतली आमदाराची भेट*l
गाव नमुना ८’ अ ‘ मिळावा, शहरवासीयांच्या मूलभूत प्रश्नावर सादर केले निवेदन.
नांदगाव खंडेश्वर :-: मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी नांदगाव खंडेश्वर तालुका कमिटीचे शिष्टमंडळाने धामणगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापदादा अडअड यांची भेट घेऊन. नांदगाव खंडेश्वर शहरवासीयांच्या मूलभूत स्थानिक प्रश्नाबाबतचे निवेदन सादर केले.
गावठाण, शासकीय, जागेवर 30 – 40 वर्षापासून राहत असलेल्या भोगावठा धारकांना गाव नमुना 8 अ मिळावा.8 अ ‘ न मिळाल्यामुळे घरकुल सारख्या योजनेपासून वंचित आहे. शबरी घरकुल योजना, प्रधानमंत्री आवास योजना, यापासून अनेक परिवार वंचित आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पहिला डी.पी आर मंजूर असलेल्या लाभार्थ्यांना 30 हजार रुपयांचे अनुदान मिळालेले नाही. त्याचबरोबर दुसरा डी.पी. आर मंजूर असलेल्या लाभार्थ्यांना उर्वरित हप्ते मिळालेले नाही. ते तात्काळ मिळावे. नांदगाव खंडेश्वर शहरातील पाणीपुरवठ्याच्या संबंधित प्रश्न, एमआयडीसी बाबतचा प्रश्न , सादर करण्यात आला. सकारात्मक चर्चा करून प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन आमदारांनी माकपच्या शिष्टमंडळाला दिले. शिष्टमंडळात माकपचे तालुका सचिव श्याम शिंदे, अनिल मारोटकर, अशोक केसरखाने, रुस्तम खा पठाण, वैद खा पठाण, राजेंद्र राऊत राजगुरू शिंदे किशोर शिंदे उपस्थित होते