क्राइम

गोवंश तस्करांना मंगरूळ पोलिसांनी केली अटक

Spread the love
13 गोवंशाची केली सुटका 
मंगरूळ (दस्त) / प्रतिनिधी 
               ठाणेदार पंकज दाभाडे यांनी मंगरूळ दस्तगीर ठाण्याचा चार्ज सांभाळताच अवैध धंद्यावर अंकुश लावायला सर्वात केली आहे. काल रात्री कत्तलीसाठी जाणारे गोवंश चे वाहन ताब्यात घेतले आहे. त्यात 13 गोवंश पाय आणि तोंड बांधलेल्या अवस्थेत आढळून आले आहे.
         काल रात्रीला ठाणेदार पंकज दाभाडे हे आपल्या चमुसह गस्तीवर असताना त्यांना पुलगाव कडून देवगाव कडे जाणारे वाहन दिसले. त्यांना वाहनावर शंका आल्याने त्यांनी वाहनाचा पाठलाग केला असता वाहनचालक भातकुली गावाजवळ अंधाराचा फायदा घेत वाहन उभे करून पळून गेला.

पोलिसांनी वाहणाची तपासणी केली असता त्यामध्ये १३ गोवंशांना पायाला व तोंडाला दोरीने बांधून निर्दयीपणे कोंबून कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे आढळून आले. १३ गोवंशिय जनवराची अंदाजे किंमत १ लाख ९५ हजार रुपये व पिकअप बोलोरो चारचाकी वाहन क्र. एम एच ३० बी.डी.०८२६ किंमत अंदाजे ४ लक्ष रुपये असा एकूण ५ लाख ९५ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला व १३ गोवंशिय जनावरे गौरक्षण संस्था धामणगाव रेल्वे येथे दाखल केले. फरार आरोपी बोलोरो पिकअप वाहन चालकविरुद्ध मंगरूळ दस्त पोलीस स्टेशन येथे विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव, पोलीस उपविभागीय अधिकारी, सचिंद्र शिंदे यांच्या
मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन मंगरूळ दस्तगीर चे ठाणेदार पंकज दाभाडे सह पोलीस कर्मचारी गजानन डवरे, सुनील उडाखे, संदीप पाटील यांनी पार पाडली.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close