हटके

सतत धार पावसात मार्बत मिरवणुकीला सुरुवात

Spread the love

अंजनगावसुर्जीच्या मारबत उत्सवाला दीडशे वर्षांची परंपरा

 नागपूर नंतर येथील कोष्टी समाजाचा मानाचा उत्सव

 इडा पिडा घेऊन जाय गे मारबत ” च्या घोषणा

अंजनगाव सुर्जी (मनोहर मुरकुटे)

पुरातन काळात अध्यात्मिक संस्कृतीतील महत्त्वाचा उत्सव मानल्या जाणाऱ्या मारबत पूजनाच्या उत्सवाला शहरातील कोष्टी समाजाच्या वतीने आज दीडशे वर्षानंतरही तितक्याच भक्तिभावाने साजरा केल्या जात असून तिसऱ्या चौथ्या पिठीतील युवक दरवर्षी या पिवळ्या मारबत मिरवणुकीचे आयोजन करते त्यात इतर समाजातील युवकांचा सुद्धा सहभाग असतो हा उत्सव साजरा करण्यात विदर्भात नागपूर नंतर अंजनगावसुर्जीचे नाव घेतल्या जाते
आजच्या प्रगत विज्ञान युगात प्रत्येकाला प्रगतीचे पंख मिळाले असले तरी पुरातन काळाच्या आठवणी आजही जपल्या जातात त्या काळात संकटाचा सामना करण्यासाठी अध्यात्माची साथ मिळवली जायची आणि त्यातून समाधान अनुभवल्या जात होते यातूनच मारबत पूजनाचा उत्सव सुरू झाल्याचे सांगितल्या जाते त्या काळात शारीरिक,आर्थिक,सामाजिक व नैसर्गिक संकट घालवण्यासाठी” इडा पिडा घेऊन जाय गे मारबत”या भावनेतून मिरवणूक काढून मारबत पूजन करण्याची पुरातन परंपरा आजही शहरात सुमारे दीडशे वर्षानंतर अविरत सुरू आहे दरवर्षी पोळ्याच्या दुराऱ्या दिवशी येथील गुलजारपुरा भागातील हनुमान मंदीरात कोष्टी समाजातील युवक मोठ्या भक्तिभावाने पोळ्याचा सण आटोपताच रात्री पिवळ्या मारबत मूर्तीचे निर्माण करतात व दुसऱ्या दिवशी करीदिनी ट्रॅक्टर ट्रॉली वर या मारबत ला विराजमान करून ढोल ताशांच्या गजरात शहरातून मिरवणूक काढल्या जाते यावेळी “इडा पिडा घेऊन जाय गे मारबत” या घोषणा दिल्या जातात आणि शहरात ठिकठिकाणी या मारबत चे नागरिकांच्या वतीने पूजन केल्या जाते व नंतर मूर्तीचे विसर्जन केल्या जाते दरवर्षी शहरवासी या मारबत मिरवणुकीची आतुरतेने वाट पाहत असतात कोष्टी साजाजातील युवकांना या उत्सवासाठी इतर समाजाच्या वतीने सुद्धा सहकार्य लाभते यावर्षी संततधार पाऊस सुरू असतानाही पिवळ्या मारबत ची वाजत गाजत मिरवणूक शहरातून निघाली यासाठी गुलजारपुरा भागातील राहुल पाटील,नागेश पाटील, दीपक मातरे,राहुल गारोडेकर, बंटी माहोरे,अक्षय केवाडे, सचिन गोखे,नरहरी लहाड,सचिन ढोरे,संदेश होरे,सागर बलंगे ,नितीन भुजाडे,राजेश मातिरे,सुमित रेखाते,दर्शन पाटील,सुधीर तायडे,कैवल्य भुजाडे,सागर लहाड,नितीन परांडे, गोटू होरे, विशाल डहाके,हर्षल गुजर,शुभम होरे,अक्षय लहाड,संजय खडसे,अक्षय गुजर,आकाश होरे,गणेश सगणे,गणेश ढोरे,विपुल गोखे,पंकज गुजर,मुकेश गुजर,उमेश गुजर, गजू पाटील,कपिल माहोरे,वेदांत भुजाडे,वेदांत तायडे,आदित्य पाटील,अक्षय माहोरे,चंदू ढोरे,पुरुषोत्तम होरे,मनीष मेण, शुभम कावरे,सचिन सावरकर,गौरव ढोरे,योगेश गुजर,प्रथमेश टेवरे,राहुल माहोरे यांनी परिश्रम घेतले तर कोष्टी समाजातील ज्येष्ठ नागरिकांचे या युवकांना मार्गदर्शन लाभले

What’s your Reaction?
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close