सामाजिक
दूषित पाणी पुरवठ्यामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात

आष्टी / प्रतिनिधी
आष्टी तालुक्यातील खडकी गावात दूषित पाणी पुरवठा होत असल्याने लहान बालकांसह जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
याकडे तत्परतेने लक्ष दिले नाही तर जिवीत हाणी सुध्दा झाल्या शिवाय राहणार नाही अशी नागरिकांची तक्रार असुन त्यांनी जिल्हाधिकारी वर्धा यांच्याकडे तक्रार सुध्दा दाखल केली आहे तर, लोकप्रतीनीधीनी सुध्दा यात लक्ष घालावे अशी त्यांची अपेक्षा आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असुन साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशात खडकी ग्रामपंचायतीच्या गलथान कारभारामुळे गावकऱ्यांना दुषीत व घाणयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमातुन बांधण्यात आलेल्या टाकीमधुन गावकऱ्यांना पाण्याचे वितरण केल्या जाते.
सुरळीत पणे पाण्याचे वितरण व्हावा या करीता ठिकठिकाणी वॉल लावले आहे. मात्र हे वॉल खोलगट भागात लावले असल्याने व सातत्याने लिकेज होत असल्याने यात दुषीत व घाणयुक्त पाण्याचा शिरकाव होवुन तो नागरिकांपर्यंत पोहचतो. याची देखरेख करणे याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे, मात्र ग्रामसेवकच लोकांच्या नजरेस पडत नसल्याने नाईलाजाने नागरिकांना याच दुषीत व घाणयुक्त पाण्याचा उपयोग करावा लागत आहे. परिणामी लहान बालकांसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असुन साथीच्या रोगांना बळी पडत आहेत .
गावात म्हणायला प्राथमीक आरोग्य केंद्र आहे, आरोग्यअधिकाऱ्याची नियुक्ती सुध्दा आहे मात्र ते सुध्दा नियमीत हजर राहत नसल्याने नागरिकांना तालुक्याच्या खाजगी डॉक्टर कडे धाव घ्यावी लागते. परिणामी एखादेवेळी नागरिकांच्या जिवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने त्यांनी याची जिल्हाधिकारी वर्धा यांच्याकडे ऑलाईन पोर्टल व्दारे मेल पाठवुन तक्रार सुध्दा केली आहे. आणि बेजबाबदारीने वागण्याऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. तसेच याकडे लोक प्रतीनीधीने सुध्दा लक्ष घालावे अशी मागणी आहे.