राजकिय

काँग्रेस च्या माजी सरपंच वर्षा धुर्वे आणि भाजपा चे शब्बीर शहा – बाबा शहा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत

Spread the love

वर्धा जिल्हाध्यक्ष शरदभाऊ शहारे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान

आर्वी / प्रतिनिधी
आर्वी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे- ग्रामीण जिल्हाध्यक्षा अश्विनी शिरपूरकर रोजगार स्वयं रोजगार जिल्हाध्यक्षा रेखा वानखडे टीम सह गनिमी काव्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संघटनेचे गावा गावात रोवत आहेत बीज
आर्वी विधानसभा आढावा बैठकीत वेग वेगळ्या सेल चे पदाधिकारी नियुक्त
आर्वी : 30/01/2024 रोजी अजितदादा पवार विचाराच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे वर्धा जिल्हाध्यक्ष शरद भाऊ शहारे यांच्या अध्यक्षतेत व संपर्क प्रमुख सुबोध मोहिते च्या मार्गदर्शनात आर्वी विधानसभा क्षेत्राची आढावा बैठक पार पडली या बैठकीला ओ बी सी सेल चे प्रदेश संघटक गणेश भाऊ चांभारे व मयूर पोहाणे प्रामुख्याने उपस्थित होते ही बैठक आर्वी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या इंदिरा चौक आठवडी बाजार येथील जनसंपर्क कार्यालयात आयोजित केली होती, यावेळी वर्धा जिल्हाध्यक्ष शरदभाऊ शहारे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी झपाट्याने वाढत आहे याचा एकच उत्साह पदाधिकारी कार्यकर्त्यां मध्ये दिसला त्यात आर्वी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे गनिमी काव्याने टीम ला घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संघटनेचे गावा गावात बिजरोपण करत असल्याचे जिल्हाध्यक्ष यांनी समाधान व्यक्त केले, नुकताच वर्धा जिल्हा सरचिटणीस दिनकर कोयरे च्या पुढाकारात रोहणा सर्कल मधील, सावंगी पौड च्या दोन टर्म काँग्रेस च्या माजी सरपंच सौ वर्षा अरुणराव धुर्वे व भाजप चे शब्बीर शहा बाबा शहा यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत आणून संघटनेला आणखी ताकद देण्याच काम सर्व पदाधिकारी करत असल्याचे लक्षात आल, तर आर्वी आष्टी कारंजा तालुक्यात सूक्ष्म नियोजन करून गावा गावात सर्व सेल सक्रिय रित्या काम करणाऱ्या सर्व जातीधर्माच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सैनिकांना संधी देत येणाऱ्या काळात पक्षात मजबुती देण्यांची आखनी करणार असल्याचे सुतोवाच जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी नी केले, यात प्रामुख्याने महिला ग्रामीण जिल्हाध्यक्षा अश्विनी शिरपूरकर, रोजगार स्वयं रोजगार वर्धा महिला जिल्हाध्यक्षा रेखा वानखेडे,जिल्हा उपाध्यक्षा शुभांगी कलोडे,सामाजिक न्यायच्या अर्चना धवणे, रो व स्व रो च्या सोनाली जैन, श्रीमती मीना बळवटकर, माधुरी सपकाळ, सोनू चिंधेकर, अशोकराव धानोरकर, अरुणराव उमरे, दिलीपराव बोरकर, किशोर मानमोडे, कमलेश चिंधेकर, अशपाक शेख, रशीद भाई,दानिश खान,योगिता धोंगळी, रामचंद्र मारबते, शरद सहारे,यांच्या सक्रिय भूमिकेने संघटन कात टाकते आहे,यावेळी खालील पदावर वेग वेगळ्या सेल नियुक्त्या करण्यात आल्या
रोजगार व स्वयं रोजगार सेल पदाधिकारी नियुक्त
सौ शीतल एकनाथ ढोरे यांना वर्धा जिल्हा उपाध्यक्षा, सौ रुपाली गडहाट यांना आर्वी शहर उपाध्यक्षा तसेच चैताली गुल्हाने
यांना शहर संघटिका सचिव करण्यात आले तर,पेरेंट बॉडीत कारंजा तालुका अध्यक्ष पदी गंगाधर डोंगरे यांची नियुक्ती करण्यात आली, तर आर्वी तालुका कार्याध्यक्ष पदी शब्बीर शहा बाबा शहा यांची नियुक्ती करण्यात आली,सामाजिक न्याय विभागाचे वर्धा जिल्हाध्यक्ष कपिलजी मुन यांच्या सूचनेनुसार, सामाजिक न्याय विभागाच्या अर्चना धवणे च्या उपस्थित महिला आर्वी तालुका अध्यक्षा पदी श्रीमती योगिता मेसेकर, आर्वी तालुका कार्याध्यक्ष पदी श्रीमती सुनीता आरे, आर्वी शहर संघटिका म्हणून सुप्रिया भोगे यांची नियुक्ती करण्यात आली, यावेळी, आष्टी तालुक्यातील वंदनाताई उईके, शोभाताई घोडाम, जिल्हा कार्यकारिणीत सदस्य पदी निवळ यावेळी सुरेंद्र वाटकर, वासुदेवराव सपकाळ,, सुषमा अतकरी, उज्वला डोफे, माधुरी मदने, तर वर्धा जिल्हा उपाध्यक्षा , लता राऊत , अनिता राणे, संध्या गाढवे, सपना खोंडे, संगीता खोडके व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close