काँग्रेस ने केली लोकसभेच्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर : 46 नावांचा समावेश

काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. या यादीत 46 उमेदवारांची नावे आहेत. वाराणसीतून काँग्रेसने पुन्हा उत्तर प्रदेशचे उमेदवार अजय राय यांना पीएम मोदींविरोधात उभे केले आहे.
याशिवाय राजगडमधून दिग्विजय सिंह यांना तिकीट देण्यात आले आहे. तर या यादीत महाराष्ट्रातील चार जागांचा समावेश करण्यात आला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने अजय राय यांना वाराणसीतून उमेदवारी दिली आहे. याचा अर्थ या जागेवर त्यांचा सामना सध्याचे खासदार असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी होणार आहे. काँग्रेसने शनिवारी लोकसभा उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली, ज्यामध्ये राजस्थानमधील तीन जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये जयपूर ग्रामीणमधून अनिल चोप्रा, करौली-धोलपूरमधून भजनलाल जाटव आणि नागौरची जागा आरएलपीसोबत युतीसाठी सोडण्यात आली आहे. तर महाराष्ट्रातील 4 उमेदवारांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातून या चार नावांचा समावेश
रामटेक (राखीव एससी) : रश्मी श्यामकुमार बर्वे
नागपूर : विकास ठाकरे
भंडारा गोंदिया : डॉ. प्रशांत यादवराव पडोळे
गडचिरोली चिमूर : नामदेव किरसान
नाना पटोले लोकसभा लढवणार नाही?
सद्या देशात लोकसभेचा बिगुल वाजला असून भंडारा गोंदिया लोकसभेची उमेदवारी संदर्भात काँग्रेसकडून नाना पटोले यांना उमेदवारी जाहिर होणार असल्याची चर्चा होती. पण नाना पटोले हे लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छूक नाही. त्यासाठी आता डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी काँग्रेस पक्षाची उमेदवारी दिली आहे. उमेदवारीची शक्यता वर्तविल्यानंतर नाना पटोले दिल्लीला जाऊन चर्चा करून आले होते. आजच्या यादीत नाव न आल्याने दिल्लीतील चर्चा कामी आली म्हणता येईल.
तिसऱ्या यादीत 7 नावे
यापूर्वी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर होती. या यादीत पक्षाने लोकसभेच्या एकूण 57 जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली होती. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत ही यादी तयार करण्यात आली होती. काँग्रेसच्या तिसऱ्या यादीत अरुणाचल प्रदेशात 2 जागा, गुजरातमध्ये 11 जागा, कर्नाटकात 17 जागा, महाराष्ट्रात 7 जागा, राजस्थानमध्ये 6, तेलंगणात 5 जागा, पश्चिम बंगालमधील 8 आणि पुद्दुचेरीतील एका जागेसाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
महाराष्ट्रातील या 7 उमेदवारांना संधी
अमरावती – आ.बळवंत वानखेडे
सोलापूर – आ. प्रणिती शिंदे
कोल्हापूर – शाहू छत्रपती
पुणे – आ.रवींद्र धंगेकर
नंदुरबार – गोवाशा पाडवी (मुलगा)
नांदेड – वसंतराव चव्हाण
लातूर – डॉ शिवाजीराव कलगे