राजकिय

काँग्रेस वेगळ्या खेळीच्या तयारीत ; त्यामागे यश किंवा दबाब तंत्र ? 

Spread the love

नवी दिल्ली / नवप्रहार डेस्क 

          लोकसभेत मिळालेल्या यशानंतर काँग्रेस ला उभारी आल्याचे पाहायला मिळत आहे. या यशाने हुरूपलेल्या काँग्रेस ने विधानसभा स्वबळावर लढण्याचे प्रयत्न चालविले असल्याचे त्यांच्या कार्यप्रणाली वरून दिसून येत आहे. त्यामुळे त्यांची ही वेगळी लढण्याची खेळी किंवा मित्रपक्षांवर दबाब आणण्याचा प्रयत्न आहे ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

कारण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यातील सर्व 288 विधानसभा मतदार संघातील इच्छुकांचे अर्ज मागविल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांनी 10 ऑगस्टपर्यंत प्रदेश कमिटीकडे अर्ज पाठवण्याची व बंडखोरी टाळण्यासाठी हमीपत्र देण्याची अट घालण्यात आली आहे.

दरम्यान काँग्रेस जरी 288 जागा लढण्याची तयारी करत असली तरी शरदचंंद्र पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वीच राज्यात ते महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे महाविकास आघाडीतील मित्रपक्षांवर दबाव टाकत जास्त जागा पदरात पाडण्यासाठी काँग्रस ही खेळी करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे यातील पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष असणार आहे.

लोकसभेत काँग्रेस सुसाट

दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढली होती. यावेळी त्यांनी 17 जागा लढवत 13 जगांवर दमदार विजय मिळवला आणि राज्यातील अव्वल पक्ष ठरले. इतकेच नव्हे तर सांगलीतून अपक्ष म्हणून निवडून आलेल्या विशाल पाटील यांनीही काँग्रेसला पाठिंबा दिल्याने त्यांचा आकडा 14 वर गेला आहे.

दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने महाविकास आघाडीच्या माध्यमातून 9 जागांवर विजय मिळवला आहे. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने 9 जगा लढवत 8 जगांवर विजय मिळवला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close