हटके

बापाची ताकद ; आवाज दिला आणि मुलगी कोमातून बाहेर 

Spread the love

नवी दिल्ली /नवप्रहार ब्युरो 

            बाप आणि लेकीचे नाते खूप जवळचे असते. बापाच्या कष्टाची जाणीव लेकीला असल्याने तिच्या नजरेत बापा बद्दल आदर असतो. बाप आणि लेक यांच्यातील सबंध काय असतात याची प्रचिती देणारी घटना समोर आली आहे.

त्याचे झाले असे की ,उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेलेल्या कराड तालुक्यातील उंब्रज गावच्या नीलम तानाजी शिंदे या तरूणीचा भीषण अपघात झाल्याने ती कोमात गेली. इमर्जन्सी व्हिसा मिळताच लेकीला भेटण्यासाठी वडिलांनी अमेरिका गाठली.

मंगळवारी (४ मार्च) स्थानिक वेळेनुसार मध्यरात्री दीड वाजता तानाजी शिंदे हे सॅक्रामेंटोमध्ये दाखल होताच त्यांनी थेट हॉस्पिटल गाठले. नीलम मी आलोय, हे वडिलांचे शब्द कानावर पडताच लेकीच्या डोळ्यांच्या पापण्यांची हालचाल झाली आणि बाप माणसाला रडू कोसळले.

अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील सॅक्रामेंटो शहरात १८ दिवसांपूर्वी कार अपघातात नीलम शिंदे ही तरूणी गंभीररित्या जखमी झाली आहे. तिच्यावर युसी डेव्हिस मेडिकल सेंटरमधील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. वैद्यकीय सुत्रांनी शिंदे यांना सकाळी यायला सांगितले. मात्र, आत्ताच मुलीला भेटण्याचा त्यांनी हट्ट केला. वडिलांच्या हट्टापुढं हॉस्पिटल प्रशासनाचे काही चालले नाही. स्टाफने त्यांना अतिदक्षता विभागात नेऊन मुलीला भेटवले.

नीलम मी आलोय, हे वडिलांचे शब्द कानावर पडताच नीलमच्या डोळ्यांच्या पापण्यांची हालचाल झाली. हा प्रतिसाद पाहून तानाजी शिंदे यांना रडू कोसळले. हॉस्पिटल स्टाफ देखील गहिवरला. बाप लेकीच्या नात्याची ताकद यावेळी सर्वांनी पाहिली. अमेरिकेत पोहचताच वडिलांनी आपल्या मुलीला डोळे भरून पाहिले. मुलीने देखील प्रतिसाद दिल्याने वडिलांना मोठा धीर आला.

अमेरिकन स्थित संस्थांचे सहकार्य

नीलमचे वडील तानाजी शिंदे आणि मामे भाऊ गौरव कदम हे इर्मजन्सी व्हिसावर अमेरिकेला गेले आहेत. दहा वर्षे व्हिसाची मुदत असते. परंतु, सहा महिन्याच्या आत त्यांना परत यावे लागते. नंतर पुन्हा ते अमेरिकेला जाऊ शकतात. या नियमानुसार नीलमचे वडील आणि मामे भावाला सलग सहा महिने अमेरिकेत राहता येईल. सुरूवातीचे दहा दिवस त्यांच्या राहण्याची सोय हॉस्पिटल प्रशासनाकडून करण्यात आली आहे. त्यानंतरची सोय अमेरिकास्थित महाराष्ट्रीयन लोकांच्या संस्थांकडून केली जाणार आहे. काही उद्योगपती देखील सहकार्यासाठी पुढे आले आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close