राजकिय

काँग्रेस माजी नगरपरिषद गटनेता वैभव उर्फ गोटू गायकवाड यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश

Spread the love

 

तालुका प्रतिनिधी– प्रकाश रंगारी

चांदुर रेल्वे नगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा गटनेते गोटू गायकवाड यांनी काँग्रेस पक्ष सोडून आमदार प्रताप अडसड त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपा मध्ये प्रवेश घेतला.
स्थानिक काँग्रेस नेता वीरेंद्र भाऊ जगताप यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जाणारे माजी नगरसेवक नगरपालिकेचे गटनेता वैभव उर्फ गोटू गायकवाड यांनी काँग्रेस पक्ष सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रवेश घेतला . धामणगाव विधानसभेच लोकप्रिय आमदार मा. प्रताप दादा अडसड हे युवा नेतृत्व आहे. मतदार संघाचा सर्वांगीण विकास व्हावा हे प्रताप दादांचे ध्येय आहे. छोट्या छोट्या कार्यकर्त्यावर लक्ष ठेवून त्यांना विचारपूस त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न भाजपाचे ज्येष्ठ नेते मा. अरुणभाऊ अडसड या मतदारसंघात करतात.
यावेळी प्रवेशाबद्दल विचारले असता माजी नगरसेवक गोटु उर्फ वैभव गायकवाड नगरपरिषद च्या माध्यमातून आपल्या प्रभागाचा चांगला विकास व्हावा यासाठी हा निर्णय घेतलेला आहे असे सांगितले. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष बबनराव गावंडे, पप्पू भालेराव, प्राविण्य देशमुख, राजू चौधरी, बच्चू वाणारे, बंडूभाऊ भुते, अजय गावंडे, गजुभाऊ जुन्नरे हे भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close