क्राइम

पोलीस अधिकाऱ्या कडून तक्रारदार तरुणीला शरीर सुखाची मागणी 

Spread the love
भंडारा / विशेष प्रतिनिधी 
              समाजातील व्यक्तीवर अन्याय होत असतील तर त्यांना सुरक्षा देऊन अन्याय करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्याची जबाबदारी असते. पण  एका तरुणीला पोलिसांचा अत्यंत वाईट अनुभव आला आहे. तिच्यावर झालेल्या अन्यायाची तक्रार करण्यासाठी ती ज्या अधिकाऱ्याकडे गेली होती त्यानेच तिच्या समोर शरीर सुखाची मागणी ठेवली आहे. या प्रकरणाने शहरात खळबळ माजली आहे. अधिकारी हा वरिष्ठ पदावर असल्याने पोलीस विभागाच्या नावावर काळिमा फासल्या  गेली आहे.
लाखनी तालुक्यातील एका तरुणी नागपूर येथे इंजिनिअरींगचे शिक्षण घेत होती. तिथे तिची ओळख एका तरूनासोबत झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. प्रेमात दोघांनीही आणाभाका घेतल्या आणि गुपचूप लग्नही केले. काही वर्षांनंतर तरुणीने प्रियकराकडे लग्नाचा हट्ट धरल्यानंतर त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. तरुणीला त्याच्यावर संशय आला त्यामुळे तिने लग्नासाठी गळ घातली. त्यावेळी त्याने तिला नकार दिला. खचलेल्या तरुणीने आत्महत्येचा प्रयत्नही केला. मात्र सुदैवाने ती बचावली. त्यानंतर तिने प्रियकराविरोधत तक्रार करण्याचा धाडसी निर्णय घेतला.  तरुणीने त्याच्या विरोधात तक्रार करण्यासाठी भंडारा उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बागुल यांच्याकडे एका महिलेसोबत गेली असता भंडारा उपविभागीय पोलीस बागुल यांनी या तरुणीला पुन्हा एकटे येण्यास सांगितले. तरुणीला पोलीस अधिकाऱ्याच्या उद्देश न कळल्याने ती पुन्हा तक्रार देण्यासाठी बागुल यांच्याकडे गेली. त्यावेळी त्यांनी तिला तिचे काम करून देण्यासाठी शरीर सुखाची मागणी केली. या प्रकारामुळे खचून गेलेल्या तरुणीने  सामाजिक कार्यकर्ते परमानंद मेश्राम यांना भेटून घडलेलां सर्व प्रकार सांगितला.
परमानंद मेश्राम यांनी या तरुणीला न्याय मिळवून देण्यासाठी थेट जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांची भेट घेतली. अखेर तरुणीच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी उप विभागीय पोलीस अधिकारी अशोक बागुल यांच्या विरोधात  ३५४ अ , ५०९ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close