Uncategorized

आता तर हद्दच झाली राव… ! लग्नानंतर सबंध कसे ठेवायचे याचे आईच.देत होती ट्रेनिंग 

Spread the love

बेंगळुरू / विशेष प्रतिनिधी

                  मुलगी वयात आल्यावर ती वाम मार्गाला लागू नये यासाठी आई दिवसरात्र तिच्यावर पाळत ठेवून असते. पण बेंगळुरू येथे ९ व्या वर्गात शिकत असलेल्या मुलीने आपल्याच आईवर ती तिला आई शरीरसंबंध कसे ठेवायचे याचं ट्रेनिंग देत असल्याचा  आणि तिचा लैंगिक छळ केल्याचा दावा  केलाय..

हे ट्रेनिंग लग्नानंतर पतीशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी उपयोगी पडतील असंही आई सांगायची. मुलीचे हे गंभीर आरोप मात्र आईने फेटाळून लावले आहेत. आता या प्रकरणाची पोलीस चौकशी केली जात आहे.

एका खासगी शाळेत मुलगी शिकत आहे. ती तिची ४५ वर्षीय आई आणि मोठ्या बहिणीसोबत राहते. आईसोबत वादामुळे मुलीचे वडील विभक्त राहतात. विद्यार्थीनीने सांगितलं की, गेल्या वर्षभरापासून हा सगळा प्रकार सुरू आहे. पोलिसांनी अद्याप पीडित विद्यार्थीनीचा जबाब नोंदवलेला नाही.

विद्यार्थीनीच्या आईला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केलीय. आईने सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. महिलेनं म्हटलं की, मुलीला ओरडले होते आणि तिला चोपही दिला होता. पण कधीही तिचा लैंगिक छळ केला नव्हता.

शाळेत महिला काउन्सिलर गेली असताना मुलीने आईबद्दल सांगितलं. त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला होता. काउन्सिलरने सांगितलं की, आठवड्याच्या सुरुवातीला काउन्सिलिंगवेळी मला याबद्दल सांगितलं. पोलिसांना याची माहिती दिली आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. एका महिला पोलिसाने पीडितेच्या घरी जाऊन आई आणि मोठ्या बहिणीची चौकशी केली. मोठ्या बहिणीने यावर काहीच माहिती दिली नाही.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Check Also
Close
Back to top button
Close
Close