अध्यक्षपदी माणिकराव मेश्राम तर उपाध्यक्षपदी बंडू तोडसाम
आदिवासी फार्मर्स प्रा. कंपनीची नवीन कार्यकारिणी गठीत
अध्यक्षपदी माणिक शा. मेश्राम तर , उपाध्यक्ष बंडू तोडसाम यांची निवड.
घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार
घाटंजी = आज दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी सेंटर फॉर कलेक्टर डेव्हलपमेंट पांढरकवडा यांच्या कडून राबवित असलेल्या शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या. यांचे प्रकल्प अंतर्गत स्थापन करण्यात आलेले ग्रामीण आदिवासी फार्मर प्रोडूसर कंपनी यांचे सब फेडरेशन म्हणून घाटंजी तालुक्यात काम करत असलेली प्रगती उपमहा संघ यांची तालुकास्तरीय बोर्ड ऑफ डायरेक्टर ची निवडणूक तिचे कार्यक्रम अंजी येथील दालमिल मध्ये संपन्न करण्यात आली या कार्यक्रमाला सेंटर फॉर कलेक्टर डेव्हलपमेंट चे प्रोग्राम मॅनेजर विठ्ठलराव कुमरे सर तसेच सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते तसेच तालुक्यातील 42 गावातील अध्यक्ष सुद्धा या निवडणूक प्रक्रियेत उपस्थित होते या निवडणुकीमध्ये सीसीडीच्या नियमावलीनुसार निवडणूक अतिशय पारदर्शकपणे पार पडली. या निवडणुकीत तालुका स्तरीय उपमाहा संघाचे 12 संचालक मंडळ निवडण्यात आले असून त्यात अध्यक्ष म्हणून माननीय श्री माणिक शामराव मेश्राम उपाध्यक्ष माननीय श्री बंडू तोडसाम ,सचिव अरविंद पेंदोर, सहसचिव नंदकिशोर तुमराम यांची निवड झालीअसून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.या संचालक मंडळामार्फत ग्रामीण आदिवासी फार्मर प्रोडूसर कंपनीचे पुढील काम व प्रगती उपमहासंघ यांचे काम चागल्या प्रकारे व कोणतेही राजकारण न करता तसेच सर्व आदिवासी लोकांचा विकासासाठी चागले निर्णय घेण्याची शपथ घेतली.
शेतकरी संघटना यांना प्रत्येक गावातील सोयाबीन तूर,व हरभरा घेण्यासाठी सहकार्य केल्या जाईल असे आश्वासन नवनिर्वाचित उपाध्यक्ष बंडूभाऊ तोडसाम यांनी दिले आहे तूर घेणे त्यापासून दाळ बनविणे आणि ते मोठया व्यापारांना विकणे असे तालुका शेतकरी संघटनेचे मोठी प्लॅनिंग असल्याचे त्यांनी सांगितले सदस्य म्हणून ,यूवराज मरापे, प्रभाकर मंगाम, शंकर वेलादे, अमोल मडावी, नागेश पेदोंर आनंदराव मंगाम प्रदिप रदंये ताई तानबाजी कनाके, यांची निवड करण्यात आली आहे त्यानिमित्ताने कार्यक्रम आयोजित केले होते या कार्यक्रमाला सीसीडी चे प्रोग्राम मॅनेजर यांची विशेष उपस्थित होती.दालमिल कामाच्या कार्यक्रमाला ग्रामीण आदिवासी फार्मर्स प्रा.कंपनीचे सदस्य संघटनेतील सर्व सदस्य आणि गावकरी मोठया संख्येने उपस्थित