क्राइम

दीड लाख रुपयांची लाच घेताना लिपिकास अटक

Spread the love

अरे बाबा ! आता अव्वल कारकून देखील मागायला लागला लाखोंत लाच

वाशीम / नवप्रहार मीडिया नेटवर्क

             ७/१२ वर नाव चढविण्यासाठी दीड लाखांची लाच मागणाऱ्या लिपिकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी फंगेहाथ अटक केली आहे. मागील ओआच दिवसांपासून ACB चे पथक त्याच्या मागावर होते. वेष बदलून ते लिपिका वर पळत ठेवून होते. आरोपी अनंत राठोड याला शंका आल्याने तो लाच स्वीकारण्यास टाळाटाळ करीत होता. पण घटनेच्या दिवशी तो फिर्यादीला फोन करून त्याच्या घरी पोहचला आणि जक्यात अडकला. ९ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

फिर्यादी यांनी कुळाच्या जमिनीचे सेल सर्टिफिकेट करून देण्यासाठी व सातबारावर नाव चढविण्यासाठी प्रकरण दाखल केले होते.

यामध्ये आरोपी अव्वल कारकून अनंत राठोड यांनी काम करण्यासाठी दीड लाख रुपयांची मागणी केली होती. पाच दिवसा पासून फिर्यादी पैसे द्यायला तयार होता. मात्र आरोपीस शंका आल्याने पैसे स्वीकारले नाहीत. ९ ऑगस्ट रोजी कार्यालय बंद झाल्यावर आपल्या गावी जाताना आरोपी हा फिर्यादीचे घरी गेला आणि तेथे लाच स्वीकारली. एसीबी चे पथक देखील पाच दिवसा पासून पाळत ठेवून होते.आणि विविध वेष भूषेत वावरत होते.

आरोपी हा घरी येत असल्याचे फिर्यादीने पथकास सांगितल्या वरून पथक तेथे गेले आणि सापळा रचून आरोपीस रंगेहाथ पकडून अटक केली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपाधिक्षक गजानन शेळके, पोलिस निरीक्षक सुजित कांबळे यांच्या पथकाने केली. याबाबत मानोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close