निमाकडून गांधीजयंती निमित्त स्वच्छता अभियान
यवतमाळ / प्रतिनिधी
यवतमाळ : *नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन शाखा यवतमाळ द्वारा महात्मा गांधी जयंती व स्वच्छता पंधरवाडा अभियाना अंतर्गत रविवार दिनांक 1 ऑक्टोंबर 2023 रोजी मोक्षधाम पांढरकवडा रोड यवतमाळ येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या स्वच्छता अभियानामध्ये सकाळी स.7:30 ते 8:30 या दरम्यान निमा सदस्यांनी मोक्षधाम येथे जाऊन स्वच्छता केली या स्वच्छता अभियानामध्ये निमा यवतमाळचे अध्यक्ष डॉ. दिनेश चांडक, सचिव डॉ.आनंद बोरा ,कोषाध्यक्ष डॉ. शैलेश यादव, राज्य उपाध्यक्ष निमा शाखा महाराष्ट्र राज्य डॉ.संजय अंबाडेकर, डॉ. विनोद डेहनकर, डॉ. विजय अग्रवाल, डॉ. प्रवीण राखुंडे ,डॉ.मंगेश हातगावकर ,डॉ.मनोज बरलोटा, डॉ.मनीश सदावर्ते ,डॉ.नंदकिशोर बाभुळकर आदि सदस्य उपस्थित होते.या सोबतच निमा यवतमाळ तर्फे 1100/- रुपये मोक्षधाम सेवा समितीला गोशाळेसाठी मदत म्हणून देण्यात आले. यावेळी मोक्षधाम सेवा समितीचे श्री संजय चिद्दरवार व श्री प्रशांत बिसेन उपस्थित होते. निमा यवतमाळचे अध्यक्ष डॉ. दिनेश चांडक यांनी दर महिन्याला एक दिवस हे स्वच्छता अभियान राबविण्यात येईल असा मानस व्यक्त केला.