सामाजिक
ग्राम स्वच्छता अभियाना अंतर्गत गोधनी ग्रामपंचायत येथे स्वच्छता अभियान
यवतमाळ / अरविंद वानखडे
यवतमाळ शहरालगत अस लेल्या ग्रामपंचायत गोधनी येथे दिनांक 2 ऑक्टोंबर महात्मा गांधी यांची जयंती निमित्त संपूर्ण देशभरात स्वच्छता पंधरवाडा साजरा करण्यात येत असून त्या पार्श्वभूमीवर, येथील डॉक्टर पंकज पवार, व त्यांचे चमू तथा गणेश मंडळ व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण गाव स्वच्छ करण्याचा संकल्प करण्यात आला आहे, गावातील महिला बचत गटांनी सुद्धा या स्वच्छता मोहीम मध्ये, भाग घेतला आहे.
यावेळी ग्रामपंचायत गोदनीचे सरपंच राजू डंबारे, माजी सरपंच तोडसाम भाऊ गणेश मंडळाचे अध्यक्ष रमेश कुंभेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. स्वच्छतेचे महत्व, स्वच्छतेमुळे होणारे फायदे, इत्यादी विषयांवर सामका आयुर्वेदिक चे डॉक्टर पंकज पवार यांनी मार्गदर्शन केले.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1