हटके

14 वर्षाच्या मुलाला नगर परिषदेची जमीन

Spread the love

सुटीच्या दिवशी खरेदी 

पंढरपूर / नवप्रहार न्यूज नेटवर्क

              शासकीय जमिनीचे घोटाळे नेहमीच उघड होत असतात. काही तर असे असतात की ते बघून अश्या प्रकरणावर हसावे की रडावे हे समजत नाही. विठ्ठल नगरी पंढरपूर येथे असाच आश्चर्य चकित करणारा भूखंड घोटाळा उघडकीस आला आहे.

पंढरपूर शहरामध्ये नगरपालिकेच्या मालकीच्या अनेक जागा पडून आहेत. त्यापैकी काही जागा भूमाफियांनी बळकावल्या आहेत. अशीच एक कोट्यावधी रुपयांच्या किमतीची जागा बोगस कागदपत्र तयार करून बळकावल्याचा प्रकार समोर आला आहे.

शहरातील डीसीसी बँक आणि बँक ऑफ इंडियाच्या पाठीमागे 4075/1/अ/1 पैकी प्लॉट नंबर 34 आणि 35 ही जागा 1977 मध्ये नगरपालिकेने ठराव करून दुर्लभदास शहा यांना दिली होती. मात्र, दुर्दैवाने शहा पती-पत्नीचे निधन झाले. त्यामुळे त्यांची मुलं गाव सोडून गेले. त्यानंतर दहा लाख स्क्वेअर फुटाची जागा पडून होती.

या जागेवर अनेक भूमाफियांचा डोळा होता. अखेर 2022 मध्ये औदुंबर सदाशिव रास्ते या सांगोला तालुक्यातील व्यक्तीने या जागेवर दावा सांगितला. पंढरपूर दुय्यम निबंधकांच्या लेखी माहितीनुसार रास्ते यांनी बोगस सही शिक्क्याद्वारे खरेदीचा दस्त तयार केला. सात बारा उताऱ्यावर आपले नाव लावून घेतले.

यामध्ये त्यांनी 26 जानेवारी 1977 रोजी नगरपालिकेकडून जागा खरेदी केल्याचे नमूद केले. मात्र, या दिवशी शासकीय सुट्टी असते हे ते विसरले. वास्तविक रास्ते यांच्या दाव्यानुसार नगरपालिकेने त्यांना 1977 ला ठराव करून खरेदी दिली असेल तर त्यावेळी रास्ते यांचे वय अवघे 14 वर्षाचे होते ही धक्कादायक बाब रास्ते यांच्या निवडणूक आयोगाच्या ओळखपत्रावरून स्पष्ट झाली आहे.

 सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी रास्ते यांनी यामध्ये भूमी अभिलेख उप अधीक्षक कार्यालय गाठले. भूमी अभिलेख कार्यालयाने नमुना 9 नुसार पंढरपूरच्या मुख्याधिकाऱ्यांना हरकत घेण्यासाठी पंधरा दिवसाच्या मुदतीची नोटीस दिली. मात्र, पंढरपूर नगरपालिकेने या नोटिसीला कचऱ्याची टोपली दाखवली. रास्ते यांनीही नोटीस मुख्याधिकाऱ्यांपर्यंत पोहोचणार नाही याची काळजी घेतली. पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने कोणीच हरकत घेतली नसल्याने भूमी उपअधीक्षकांनी औदुंबर सदाशिव रास्ते यांचे नाव सातबारा उताऱ्यावर नोंद केले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close