सामाजिक

शहरातील सामरा नगर येथील सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त

Spread the love

 

नितीन कदम यांनी जाणून घेतल्या नागरीकांच्या व्यथा*

लवकरच मनपा प्रशासनाविरोधात आंदोलनाची चिथावणी*

प्रतिनीधी/अमरावती*

शहरातील सामरा नगर येथील नागरीक गेल्या दीड ते दोन वर्षापासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या भूमिगत गटार वहिनी फुटून रस्त्यावर व खुल्या प्लॉटमध्ये साचलेल्या सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.वारंवार महानगर पालिका आयुक्तांना लेखी तक्रारी देऊनही मार्ग निघाला नाही.करीत आज नागरिकांनी थेट नितीन कदम यांना संपर्क साधून सदर वस्तूपरिस्थितीचा आढावा दिला.नितीन कदम यांनी भेट देत सर्व परिस्थिती लक्षात घेऊन मनपा विरोधात लवकरच याविरोधात आंदोलनं छेडण्याची चेतावणी दिली.या सामरा नगर परीसरात कचरा उचलण्याऐवजी केवळ पार्किंगच्या मार्गावरील कचरा उचलण्याचा मार्ग पार पाडण्यात प्रशासनाने धन्यता मानली आहे. या खुल्या प्लॉटवर व रस्त्यावरील साचलेले सांडपाणी कायम असून, येथील दुर्गंधी आणि डासांच्या प्रादुर्भावामुळे साथरोग फैलावण्याची भीती निर्माण झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
येथील कुजलेल्या कचऱ्याबाबत नागरिकांनी गेल्या अनेक दिवसांपूर्वी आवाज उठविल्यानंतर येथे स्वच्छता करण्यात आली. पण, ही स्वच्छता केवळ तात्पुरती म्हणून केल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. शहरात साथीच्या रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असताना आणि खबरदारी म्हणुन मनपा प्रशासन विवीध उपाययोजना, उपक्रम्, जनजागृती करित असते.परंतु ती केवळ कागदीस्वरूपातील असल्याचं येथील नागरिकांनी खंत व्यक्त केली.सदर बाबीमुळे शहरातील स्वच्छतेबाबत प्रशासनाची उदासीनता समोर आली आहे.
आरोग्य मंत्रालयाकडून स्वच्छतेवर भर देण्याचे आवाहन वारंवार केले जात असून, जिल्ह्यात विशेष खबदारी घेत असल्याचे प्रशासन सांगत आहे. मात्र, शहरातील स्थिती पूर्णत: वेगळी असल्याचे वास्तव आहे. येथील सांडपाण्यात प्लास्टिक, पिशव्या यांसह इतर कचरा असून, त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने साथींचे रोग बळावण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी नितीन कदम व येथील स्थानिक नागरिकांनी केली आहे.
यावेळी संकल्प शेतकरी संघटनेचे नितीन कदम, स्वप्निल मालधुरे,अभिषेक सवाई,शंतनु रोडे, शिला दंदाडे, मनीषा साळवे, देवकुमार इंगळे, प्रवीण ठवकर, नरेंद्र लांजेवार, प्रणय भुसारी, प्रतीक्षा रोडे, मनीष देशमुख, लक्ष्मीकांत कुकुटकर, मंगेश जूनेवार, राजेन्द्र मोहिते, नरेंद्र सिवया, आशिष गावंडे, सचिन शिखरे, राजेश राऊत, सुखदेव देवतारे, अर्चना इंगळे, उमेश ठवकर, मंगला रोडे व ईतर नागरीक हजर होते.

सदर सामरा नगर येथील सांडपाण्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. मनुष्यवस्तीत अशाप्रकारची स्वच्छतेविषयीची बाब अत्यंत निंदनीय आहे. यावर मनपा प्रशासनाने लवकरात लवकर उपाय योजना आखाव्यात. व रोगराईच्या प्रादुर्भावातून येथील नागरिकांना मुक्त करावे. अन्यथा सर्व नागरीकांना सोबत घेऊन आंदोलनं करू..!

                                                       नितीन कदम 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close