Uncategorizedहटके

यालाच म्हणतात ‘ गोद मे बच्चा और गाव मे पुकार  ‘

Spread the love

यालाच म्हणतात ‘ गोद मे बच्चा और गाव मे पुकार  ‘

नवी दिल्ली / नवप्रहार न्यूज नेटवर्क

                 काही म्हणी अश्या असतात ज्या एखाद्या उदाहरण देण्यासाठी वापरतात. पण एखादा प्रसंग असा येतो की ती म्हण त्यावर फिट बसते. सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. बाळाची आई मोबाईल मध्ये ईतकी गुंग आहे की आजूबाजूला काय घडत आहे याची तिला माहिती नाही. तिला वाटते की तिचे मूल वॉकर मध्ये आहे. ती मोबाईल। पाहता पाहता वॉकर ला हलवत असते. जेव्हा तिचे लक्ष वॉकर कडे जाते तेव्हा तिला त्यात बाळ दिसत नाही. त्यामुळे ती घाबरते आणि बाळाला शोधू लागते. वास्तविक पाहता बाळ तिच्या कडेवरच असते. तिच्या जेव्हा हा प्रकार लक्षात येतो तेव्हा ती स्वतःच हसते आणि बाळाचा मुका घेते. 

                

अँड्रॉ्रॉ्इड मोबाईल चा वापर वाढल्या पासूून तरूणच नाही तर लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वच याचा वापर करतात. मात्र कधी कधी याचा अतिवापर लोकांच्या अंगलट येतो. लोक काम करायला विसरतात, महत्त्वाच्या गोष्टी विसरतात. असाच काहीसा प्रकार सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये पहायला मिळतोय.

एक महिला मोबाईलच्या नादात आपलं बाळच कुठे ठेवलंय ते विसरते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधत घेत आहे. व्हिडीओमध्ये एक महिला आपल्या मोबाईलमध्ये बिझी दिसत आहे आणि दुसरीकडे ती तिच्या पायाने बेबी वॉकर फिरवत आहे. तिने एका मुलाला दुसऱ्या हातात धरले आहे.अचानक महिलेचे लक्ष फोनवरून वॉकरकडे गेले आणि तिला धक्काच बसला. तिला वाटलं आपलं बाळ कुठेतरी गेलं. ती घरात बाळ शोधू लगाते. नंतर तिला समजतं की तिचं बाळ तर तिच्याकडेच आहे.

हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. @TheFigen_ नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 21 सेकंदाच्या या व्हिडीओवर अनेक कमेंट येत आहेत.

दरम्यान, मोबाईलच्या वापरामुळे लोकांचं आपल्या आसपासच्या जगाकडेही लक्ष जात नाही. मोबाईल वापरण्यात ते इतके बेधुंद होतात की, बाकीच्या गोष्टींचं त्यांना भानच राहत नाही. त्यामुळे मोबाईलचा वपर हा जेवढा चांगला आहे तेवढाच घातकही. कधी मोबाईलचा वापर तुमच्या जीवावर येईल काही सांगू शकत नाही.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close