सामाजिक

फुग्याच्या सिलेंडर चा स्फोट झाल्याने बालकाचा मृत्यू 

Spread the love

नागपूर / विशेष प्रतिनिधी

शहरात ख्रिसमस च्या पूर्वसंध्येला घडलेल्या एका घटनेने खळबळ माजली आहे. येथे फुगे फुगवण्याच्या सिलेंडर मध्ये झालेल्या स्फोटात एका 4 वर्षीय बालकाचा मृत्यू  झाला आहे.  तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुलाच्या हट्टापायी मुलाची मावशी त्याला घेऊन फुगेवाल्याकडे गेली असतांना हा अपघात घडला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, ख्रिसमसच्या सुट्ट्यानिमित्त सिझान त्याच्या मावशीसोबत फिरण्यासाठी मैदानात गेला होता. त्यावेळी रात्री साडे आठच्या सुमारास मैदानात एक जण गॅसने भरलेल्या फुगे विकत होता. फुगे पाहताच सिझानने फुग्यासाठी हट्ट धरला . फुगे घेण्यासाठी सिझानला घेऊन मावशी फुगेवाल्याकडे गेली. तेव्हा फुगेवाला फुगे फुगवत असताना अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की सिलिंडर हवेत उंच उडाला. स्फोटात आग भडकल्याने त्यात होरपळून सिझान गंभीर जखमी झाला. त्याच्यासोबत मावशी आणि आणखी एक महिला जखमी झाली.

स्फोटानंतर सिझानसह जखमींना रुग्णालयात नेलं. मात्र सिझानचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या घटनेनंतर पोलीस फुगेवाल्याचा शोध घेत आहेत. सिझान आसिफ शेख असं मृत्यू झालेल्या चिमुकल्याचं नाव आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close