गोमुखेश्वर संस्थान इंझोरीद्वारे आयोजित बाल सुसंस्कार अध्यात्मिक शिबिरात डॉ. महेश चव्हाण यांचा सत्कार!
डॉ. गुणवंत राठोड कारंजा प्रतिनिधी
कारंजा (लाड): दिनांक १६ मे २०२४ रोजी, डॉ. महेश चव्हाण हे कारंजा (लाड) दौऱ्यावर असताना गोमुखेश्वर संस्थान इंझोरी ता. मानोरा यांनी आयोजित संत सेवालाल महाराज बाल सुसंस्कार अध्यात्मिक शिबिरात त्यांना आमंत्रित केले होते. यावेळी डॉ. चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यानंतर त्यांनी शिबिरात उपस्थित असलेल्या बालकांना संबोधित केले.
डॉ. चव्हाण यांनी आपल्या भाषणात शैक्षणिक, अध्यत्मिक आणि आरोग्य या विषयांवर मार्गदर्शन केले. त्यांनी मुलांना अभ्यासात लक्ष देण्यास चांगले संस्कार विकसित करण्यास आणि नियमित व्यायाम करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमात शिबिराचे प्रमुख श्री. गोपीचंद महाराज साळंबी, श्री. नारायण महाराज जाधव यवतमाळ, आयोजक मारोती मात्माजी, ह.भ.प. तारासिंग महाराज, हिरालाल भाऊ आणि अनेक भाविक आणि बाल विद्यार्थी उपस्थित होते.
गोमुखेश्वर संस्थान इंझोरी द्वारे आयोजित हे बाल सुसंस्कार अध्यात्मिक शिबिर मुलांमध्ये चांगले संस्कार विकसित करण्यासाठी आणि त्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित करण्यात आले होते.