शैक्षणिक

न्यू इंग्लिश स्कूल पारनेर विद्यालयात विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण .

Spread the love

 

पारनेर [ श्री सुरेश खोसे पाटील यांजकडून ] – महाराष्ट्र सरकारच्या वतीने एसटी मंडळातर्फे दरवर्षी मुलींसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेअंतर्गत मुलींना शिक्षण घेण्यासाठी मोफत एसटी प्रवास पास दिले जातात . या मोफत पास योजनेअंतर्गत पारनेर येथील न्यू इंग्लिश विद्यालयात पासचे वितरण करण्यात आले .
शिक्षणासाठी विद्यार्थिनींना अहिल्यादेवी होळकर योजनेअंतर्गत मोफत एसटी पास दिले जातात .मुलींना एस टी आगारात जाऊन पास काढण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागत होते . मुलींची ही गैरसोय टाळण्यासाठी पारनेर आगाराचे वाहतूक निरीक्षक अमित हंपे , सागर लोंढे , राजू गोरे , राजेश रायकवार यांनी विद्यालयात येऊन एसटी पासचे वाटप केले .
या प्रसंगी विद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या श्रीमती मनिषा गाडगे , क्रीडा शिक्षक बापूराव होळकर , सतिष फापाळे , अजित दिवटे , जयवंत पुजारी , संतोष ठाणगे , संदिप लंके , विद्यालयाचे पास वितरण समितीचे प्रमुख श्रीमती रीमा भिंगार दिवे , श्रीमती सुरेखा थोरात , सोमनाथ चौधरी यांच्या उपस्थितीत विद्यार्थिनींना पासाचे वाटप करण्यात आले . या प्रसंगी वाहातूक निरीक्षक अमित हंपे यांनी सांगितले की, मुलींना एसटी पास काढण्यासाठी शाळा बुडवून बस स्थानकात तासनतास गर्दीत उभे राहावे लागत होते . त्यांची गैरसोय टाळण्यासाठी आम्ही हा उपक्रम राबविला आहे . विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती मनिषा गाडगे यांनी पारनेर एसटी मंडळाच्या सर्व आधिकारी वर्गाचे आभार मानून एसटी महामंडळाने विद्यालयात येऊन मुलींना पासचे वितरण केले , हा उपक्रम स्तुत्य आहे . मुलींना विद्यालयातच एसटी मंडळाकडून पासेस मिळाल्याने त्यांना मोठा आनंद व समाधान झाल्याचे त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होते . विद्यालयाच्या वतीने सर्व एसटी अधिकारी वर्गाचा सन्मान व सत्कार करण्यात आला .

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close