बापाचे अनैतिक संबंध मुलांच्या मारहाणीत बापाचा मृत्यू
संबंधात असलेल्या महिलेच्या तक्रारी वरून तिन्ही मुलांना पोलिसांनी घेतले ताब्यात
केज / नवप्रहार मीडिया
अनैतिक संबंधाचा शेवट हा कोण्या एकाचा खून हा आहे याची माहिती असतांना देखील अनेक लोक अनैतिक संबंधात अडकतात. अश्याच अनैतिक संबंधात असलेल्या वडीलांमुळे कौटुंबिक वाद होत असल्याने मुलांनी वडिलांना मारहाण केली आहे.आणि या मारहाणीत वडिलांचा मृत्यू झाला आहे . मय्यत व्यक्तीशी संबंधात असलेल्या महिलेने पोलिसात तक्रार दिल्याने पोलिसांनी तिन्ही मुलांना ताब्यात घेतले आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज येथील अहिल्यादेवी नगर येथील मनोहर गायके (वय ४५ वर्ष) यांचे त्यांच्या शेजारी राहत असलेल्या एका चार मुलांची आई असलेल्या विधवा महिलेशी अनैतिक संबंध होते. त्यामुळे मनोहर गायके यांच्या कुटूंबात नेहमी भांडणे होत होती. दि. १९ जुले रोजी रोजी सायंकाळी ५:०० वा. च्या सुमारास मनोहर गायके व त्यांची पत्नी पार्वती यांच्यात शिवीगाळ चालु होती. त्या वेळी पार्वती तिचा नवरा मनोहर गायकेला म्हणाला की, तू असे का वागतोस ? म्हणून ते त्याला भांडत होते. त्या वेळी मनोहर गायके याची तीन मुले कृष्णा गायके, ईश्वर गायके व शंकर गायके या तिघांनी प्लास्टीकच्या पाईपने बेदम मारहाण केली.
तिन्ही मुलांनी मारहाण केल्यानंतर मनोहरला त्या महिलेच्या दारात टाकुन ते निघुन गेले. त्या नंतर त्या महिलेने घराचे बाहेर येऊन मनोहरला यास उठविण्याचा प्रयत्न केला असता तो उठत नव्हता. म्हणून त्या महिलेने रात्री तिला धमकी देऊन मनोहर गायके याला मारहाण केल्या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तिने तक्रार दिल्या नंतर घरी येऊन पाहिले असता मनोहर हा तिच्या दारात दिसला नाही.अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी त्यास मृत घोषिक केले. त्यानंतर दि. २१ जुलै रोजी त्या महिलेच्या फिर्यादी वरून मनोहर गायके याला त्याच्या मुलांनी केलेल्या मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाला म्हणून कृष्णा मनोहर गायके, शंकर मनोहर गायके, ईश्वर मनोहर गायके या त्याच्या तिन्ही मुला विरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तिन्ही मुलांना ताब्यात घेतले असून पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे हे पुढील तपास करीत आहेत.