औ. प्र. संस्था अकोट येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करियर शिबिर संपन्न
अकोट / प्रतिनिधी
रोजगार उभारणी करीत शासनाने विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत त्यांचा लाभ घेऊन स्वतःच्या पायावर उभे रहा असे आव्हान आमदार प्रकाश भारसाकडे यांनी विद्यार्थ्यांना केले शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अकोट द्वारा आयोजित छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिरात उद्घाटक म्हणून ते बोलत होते .
बेरोजगारांना रोजगार कुठे व कसा उभारावा तसेच याकरिता आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची माहिती व्हावी याकरिता छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीर चे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती त्यांनी दिली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी श्री शरदचंद्र ठोकरे साहेब होते . आयटीआयच्या प्रशिक्षणासोबत जपान व जर्मनी सारख्या देशांच्या लँग्वेज आत्मसात करावे त्यामुळे विदेशा मध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. प्रमुख अतिथी म्हणून श्री बिटोडे साहेब सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र अकोला . यांनी स्वयंरोजगाराकरिता शासनाच्या विविध योजना बाबतची माहिती दिली तसेच श्री अनंत गावंडे अकोट यांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक बना असे आवाहन केले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री प्रमोद गोंडचर सर यांनी नवीन तंत्रज्ञान आधारित प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी या विषयावर मार्गदर्शन केले.श्री प्राध्यापक प्रवीण बोंद्रे हे होते यांनी इयत्ता दहावी व बारावीनंतर करिअर बाबत मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य श्री हिवराळे सर यांनी तर सूत्र संचालन विजय वानखडे यांनी व आभार सौ महल्ले मॅडम यांनी मांडले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तेल्हारा आयटीआयचे प्राचार्य व कर्मचारी वृंद तसेच अकोट आयटीआय चे गटनिदेशक श्री भवाने सर, इंगळे सर ,लहाने सर तथा सर्व शिल्प निदेशक तसेच कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेवून पंचकृशितील विद्यार्थ्यांनी शिबिराचा लाभ घेतला.