चेतना माध्यमिक विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर,महात्मा ज्योतिबा फुले संयुक्त जयंती साजरी .
महामानवाच्या जयंती चे औचित्य साधून देशकर मॅडम यांनी स्वखर्चाने विद्यार्थ्यांना केले नोटबुक व पेनचे वाटप.
ग्यानीवंत गेडाम/वरोरा
वरोरा तालुक्यातील मजरा रै येथील चेतना माध्यमिक विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती संयुक्तरीत्या घेण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्प माला अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे मुख्याध्यापक अरविंद ढवस, सामाजिक कार्यकर्ता ग्यानीवंत गेडाम, देशकर मॅडम उपस्थित होत्या.
बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचा हक्क आज सगळ्यांना समानतेने जगण्याची संधी देत आहे. या संविधानातून उजेडाची दिशा दिल्याने हजारो वर्षाचा अंधार नष्ट झाला व सगळ्यांना मान सन्मानाने जगण्याचा हक्क मिळाला. या महान महापुरुषांच्या जयंतीनिमित्त चेतना माध्यमिक विद्यालयातील शिक्षिका देशकर मॅडम यांनी आपण ज्या समाजात जन्मलो त्या समाजाचे आपल्यावर अनगिनत उपकार असल्याची जाणीव असून मी जे काही आहे आज बाबासाहेबांमुळेच असुन त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी स्वखर्चाने शालेय विद्यार्थ्यांना पेन व नोटबुक चे पाहुण्यांच्या हस्ते वाटप केले. व उपस्थित शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्राचा उलगडा केला. यावेळी देशकर मॅडम, व कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक अरविंद ढवस यांनी विद्यार्थ्यांना बाबासाहेबांबद्दल विशेष मार्गदर्शन केले. यावेळी प्रामुख्याने शालेय कर्मचारी अविनाश महाकाळे व शालेय विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.