राज्य/देश

लाईव्ह कार्यक्रमादरम्यान चेंगराचेंगरी ; 4 विद्यार्थ्यांचा मृत्यू

Spread the love

केरळ / नवप्रहार मीडिया

                  केरळच्या कोचिन विद्यापीठात ऐक धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे सुरू असलेल्या म्युजिक लाईव्ह कार्यक्रमा दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 4 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.विद्यापीठातील ओपन-एयर ऑडिटोरियममध्ये सुरु असलेल्या कार्यक्रमाला गालगोट लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर या घटनेत 64 जण जखमी झाल्याची माहिती राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.

विद्यापीठात टेक फेस्टचे आयोजन करण्यात आलं होतं आणि गायिका निकिता गांधी कॅम्पसमध्ये असलेल्या खुल्या सभागृहात सादर करत होत्या. पोलिसांच्या अहवालात असं म्हटलं आहे की, पास असलेल्यांना प्रवेश प्रतिबंधित करण्यात आला होता, परंतु जेव्हा पाऊस सुरू झाला तेव्हा परिस्थिती बदलली. बाहेर वाट पाहणारे लोक आश्रय घेण्यासाठी सभागृहात घुसले, त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. त्यामुळे सर्वत्र गोंधळ उडाला. आयोजकांनी मुलांना आवरण्याचा प्रयत्न केला. मात्र, परिस्थिती हाताबाहेर गेली होती. अनेकांनी एकमेकांनी तुडवत वाट काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गोंधळ उडाल्याचं दिसून आलं होतं.

काही जण कार्यक्रमानंतर बेशुद्ध पडले. त्यात 15 मुली आणि 8 मुलांचा समावेश असल्याची माहिती समोर आलीये. 55 विद्यार्थी जखमींवर विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. दोन मुले आणि दोन मुलींना कोचीच्या कलामासेरी मेडिकल कॉलेजमध्ये मृत आणण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री जॉर्ज यांनी दिली आहे. दोन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांसह डॉक्टरांचे पथक रुग्णालयात पोहोचले, असं एर्नाकुलमचे जिल्हाधिकारी एनएसके उमेश यांनी सांगितलं आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close