नागपुर च्या ” लॉंग मार्च ” आंदोलना च्या तयारी संदर्भात सभा संपन्न
मुर्तिजापूर (प्रतिनिधी ) वेगळ्या विदर्भ राज्याच्या आंदोलनाला अती तीव्र करण्यासाठी 9 ऑगस्ट क्रांती दिनी माजी आमदार वामनराव चटप
नेतृत्वाखाली ” लॉंग मार्च ” आंदोलन पुकारले असुन सदर आंदोलनाच्या पुर्व तयारी आणि नियोजनासाठी विशेष सभेचे आयोजन आज दु . 3:00 वाजता शासकीय विश्राम गृहात करण्यात आले होते .
या वेळी जिल्हाध्यक्ष सुरेश जोगळे यांनी माजी आमदार वामनराव चटप यांनी उभारलेल्या करु किंवा मरु अशा तिव्र आंदोलनाबद्दल माहिती देतांना वेगळा विदर्भ सर्वांगाने कसा वैदर्भीयांच्या हिताचा आहे . यावर प्रकाश टाकला . तर तालुकाध्यक्ष अरविंद तायडे यांनी तालुक्यातील युवकांना आंदोलनात सहभागी होण्यासाठी आवाहन केले . तसेच शहर अध्यक्ष अनिल डाहेलकर यांनी वेगळ्या विदर्भ राज्यापासुन होणाऱ्या फायद्यांचेच महत्व नाही तर आपल्याला मिळणारे अधिकार – हक्क या आंदोलनाच्या निमित्ताने घरा – घरात पोहचविणे गरजेचे आहे असे आपले मत व्यक्त केले .
या सभेला सुरेश जोगळे, मनोज तायडे, अरविंद तायडे, अनिल डाहेलकर , रामचंद्र तायडे, बाळासाहेब तायडे, विजय मोरे, गुलाबराव मसाये, शरद भाऊ सरोदे, रवींद्र भाऊ ठाकरे, गजानन नागे , नितीन भाऊ गांवडे, संतोष कोळसकर व बरेच विदर्भवादी कार्यकर्ते उपस्थित होते .